भारतीय लष्कराच्या अशा काही रेजिमेंट्स ज्या युद्धभूमीवर पाऊल टाकताच शत्रूला गारद करू शकतात Some of the regiments of the Indian Army that can guard the enemy as soon as they step on the battlefield

भारतीय लष्कराच्या अशा काही रेजिमेंट्स ज्या युद्धभूमीवर पाऊल टाकताच शत्रूला गारद करू शकतात. भारतीय सैन्यात रेजिमेंट्स परंपरा इंग्रज काळापासून चालू आहे, इंग्रजांनी भारतीय सैन्यात परंपरा, बटालियन प्रकार रुजविला. रेजिमेंट्स हा प्रकार इंग्रजांच्या मार्शल लॉ थेअरी वर ब्रिटिश भारतीय सैन्यात रुजविला तेव्हापासून हा प्रकार भारतीय लष्करात रुजू झाला,पण 1965 नंतर आणि त्यापेक्षाही खलिस्तान प्रकरणानंतर मार्शल लॉ हा प्रकार सैन्याने बंद केला(भारतीय लष्कराने). पण अशा काही रेजिमेंट्स बद्दल सांगणार आहोत.ज्या चित्रपटात हिरो ची कशी एन्ट्री असते त्याप्रमाणे युद्ध भूमीवर उतरल्यावर क्षणभरात शत्रूला गारद करू शकतात, किंबहुना नाव ऐकून देखील शत्रू गारद होऊ शकतो अशा काही रेजिमेंट्स  सांगणार आहोत......रेजिमेंट्स पायदल तुकड्याबद्दल बरं का?

विशेष मोहिमेदरम्यान भारतीय जवान


गोरखा रायफल्स:-- Gorakha Rifles
घोषवाक्य:भ्याड सारखे जगण्यापेक्षा मरणे चांगले 
युद्धघोष: जय महाकाली यो गोरखाली
39बटालियन
एक गोरखा जवान

गोरखा लोकांबद्दल आपण ऐकलेच असेल की, हो ना हो बरोबर चित्रपटात कधी पहारेकरी ची भूमिका बजावताना गोरखे पहिलेच असतील आणि बरोबर गोरखा लोक चायनिज च्या गाड्यांवर वेगवेगळे पदार्थ बनवताना पहिलेच असतील. तुम्हांला आठवलं असेल ना,  आपला लाडका अभिनेता अजय देवगण ने 'LOC KARGIL' चित्रपटात गोरखा अधिकाऱ्याची 'कॅप्टन मनोज पांडे' ही जिवंत भूमिका साकारली होती.
      गोरखा लोक  मूळचे नेपाळचे तसेच सिक्कीम, मिझो पूर्व भारतात आढळतात. हे लोक उंचीने कमी पण,ताकदीने भारी असतात. त्यांची hand movement खूप जलद असते. गोरखा जमात प्रामाणिक काम करण्यासाठी ओळखली जाते. यांचे वैशिष्ट्ये असे आहे की,"हे लोक भिऊन जगण्यापेक्षा मरणे पसंद करतील " असे उद्गार फिल्ड मार्शल सॅम maneksha यांनी काढले आहेत. सुमारे 40,000 गुरखे भारतीय संरक्षण दलात आहेत.गोरखा च्या तुकड्या 1/11,2/11,5/11,7/11GR इ. नावाने ओळखल्या जातात. गोरखा लोक नेपाळ आर्मी, इंडियन आर्मी, ब्रिटिश आर्मी, सिंगापूर आर्मी त त्यांच्या बटालियन आहेत.  गोरखा रेजिमेंट्स ने पहिल्या, दुसऱ्या महायुद्धबरोबरच ,अनेक युद्धात त्यांचा सहभाग होता. गोरखा रायफल्स अशी बटालियन आहे की, ती थेट आक्रमणासाठी ओळखली जाते.कारगिल युद्धात फार मोठा पराक्रम गाजवला होता त्यासाठी मनोज पांडे व थापा यांना PVC ने सन्मानित करण्यात आले होते.

अधिक माहितीसाठी
Parachute Regiment (para SF) पॅराशूट रेजिमेंट:--
घोषवाक्य:शत्रुजित
युद्धघोष:तुम भारत के वीर हो, तुम अपना देश के रक्षक हो.

17 बटालियन

मुख्यालयातील फोटो


ही रेजिमेंट म्हटल्यावर आपल्याला ह्या वर्षीचा प्रजासत्ताक दिनी झालेल्या परेड मधील 5 KM चा Hell March आठवला असेलच आणि गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला 'URI-The Surgical strike' हा चित्रपट आठवलाच असेल ना!
           पण ह्या बटालियन चे जवान लाल मरून वर बलिदान badge मध्ये पहिलेच असतील चित्रपटात , ही रेजिमेंट  तिरंग्याचे आठवण करून देते कारण  ही रेजिमेंट च्या badge मध्ये त्रिशूल टाईप  आहेत .
 " तीन रंगो मे एक निशाणा "
ही रेजिमेंट चे जवान अधिकारी खूप privacy बाळगतात सहजपणे हे para sf चे असतात हे कोणाला सहज माहीत होतं नाही.हे गुप्त मोहिमेसाठी ह्या बटालियन चे नाव आहे ..असे सांगितले जाते की, ह्या फोर्स च्या जवानांनी अडीच किलोमीटरची पाकिस्तानमध्ये  crawling केली असे सांगितले जाते. ही रेजिमेंट दहशतवादी ग्रस्त भागात तैनात असते.
राजपुताना रायफल्स (Rajputana Rifles):
घोषवाक्य:वीर भोग्या वसुंधरा
युद्धघोष: राजा रामचंद्र की जय
25 बटालियन


राजपुताना रेजिमेंट चे वॉर मेमोरियल


ही भारतीय सैन्यातील पहिली रायफल रेजिमेंट आहे.
ह्या रेजिमेंट्स ने  पेशवा विरुद्ध इंग्रज झालेल्या लढाईत ( खडकीची लढाई) इंग्रजांबरोबर लढली होती. ह्या रेजिमेंट ने कारगिल युद्धात खूप मोठा पराक्रम गाजवला होता. महायुद्धात देखील सहभाग होता. ही रेजिमेंट राजपूत आणि जाट भरती करते. त्याबरोबर 2nd World war , अफगाणिस्तान च्या युद्धात, इस्राएल च्या युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता.
  
गढवाल रायफल्स (Garhwal Rifles):---
घोषवाक्य: युद्ध क्रीत निश्चय
युद्धघोष: बद्री विशाल की जय
Battalion 22
गढवाल रेजिमेंट चे मुख्यालय

गढवाल रेजिमेंट मुख्यतः उत्तराखंड मधून जवान भरती केले जातात. ह्या रेजिमेंट ने भारतीय सैन्याने एकूण एक लढलेल्या लढाईत महत्वाचा सहभाग आहे.यातील 7th battalion ला दक्षिण सुदान च्या शांतिसेनेत पाठवण्यात आले होते. ही रेजिमेंट कितीतरी व्हिक्टोरिया क्रॉस ची मानकरी आहे. विशेष म्हणजे आताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संरक्षण प्रमुख गढवाल परिसरातील आहेत.
       गढवाल बटालियन ने त्यांची युद्ध क्षमता पहिल्या विश्वयुध्दात दाखवली, त्यांनी जर्मन सैन्यास सळो की पळो करून सोडले होते,  त्यांनी न्यू शैपल नामक जर्मन सैन्याचे अवघड अशा ठाण्यावर कारवाई करून सुमारे 105 जर्मन सैनिक युद्धबंदी केले.त्यासाठी फ्रांस आणि जर्मन सेना गढवाली लोकांना लोखंडी लोक असे मानत असे;
       1971च्या युद्धात देखील गढवाल बटालियन चा महत्वाचा वाटा होता. 5th बटालियन ने बांग्लादेश  स्वातंत्र्य लढ्यात पाकिस्तान सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले. अशा पराक्रमी रेजिमेंट चे मुख्यालय 'Lansdowne'  येथे आहे. इथे भलेमोठे लष्कराचे संग्रहालय आहे.

Kumoun Regiment कुमाऊं रेजिमेंट
घोषवाक्य: पराक्रम विज्यते
युद्धघोष: काली माता की जय
22 बटालियन
कुमाऊं चे चिन्ह

     कुमाऊं ही एक अशी रेजिमेंट आहे की,त्यांनी 1965 च्या युद्धात चीनला पाणी पाजले होते, तब्बल 120 जवानांनी मेजर सैतान सिंग या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी चिनी सैनिकांना पाणी पाजले होते अन त्यांच्या मदतीला 13 कुमाऊं चे जवान ते यादव होते आणि उष्ण पठारी प्रदेशातून असून देखील; याच रेजिमेंट चे शूर मेजर सोमनाथ शर्मा यांनी पहिला PVC अवॉर्ड प्रदान करण्यात आला. त्यांनी स्वातंत्र नंतर काळात अनेक युद्धात भाग घेतला होता. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. कुमाऊं चे मुख्यालय राणीखेत मध्ये आहेत आणि ही रेजिमेंट 80% कुमाऊं व 20% अहिर अशा composition ने भरती केली जाते. ही रेजिमेंट पहिली हैदराबाद रेजिमेंट नावाने ओळखली जायची.

मद्रास रेजिमेंट Madras Infantry
घोषवाक्य:स्वधर्म निधानम् श्रेयाहा
युध्दघोष: वीर मद्रासी, अडी कोल्लू अडी कोल्लू 21 बटालियन


मद्रास रेजिमेंट चे चिन्ह

काही दिवसांपूर्वी  south इंडियन चित्रपट 'Return of Abhimanyu' हा तमिळ हिंदी dubb movie आपण पहिलाच असेल या चित्रपटात विशाल, समंथा अक्केनी यांनी भूमिका बजावल्या होत्या. ही रेजिमेंट south india region  मधून भरती केली जाते.  त्यात प्रामुख्याने तामिळनाडू, केरळ, आंध्र आणि कर्नाटक मधून भरत्या केल्या जातात.ही रेजिमेंट पूर्वी नायर रेजिमेंट म्हणून ओळखली जायची.

Maratha light Infantry मराठा रेजिमेंट:
घोषवाक्य: कर्तव्य, मान, साहस
युध्दघोष: छत्रपती शिवाजी महाराज की जय
25 बटालियन
काली पाचवीं 2nd MarathaLI


मराठा रेजिमेंट चा बॅच

आपण नाना पाटेकर चा प्रहार सिनेमा पहिला असेलच ना,त्यात नानाने मेजर ची भूमिका पार पाडली होती.
 मराठा बटालियन ही खूपशा जुन्या बटालियन पैकी एक आहे . मराठा रेजिमेंट ला सुमारे 252 वर्षे पूर्ण झाले आहेत.मराठा रेजिमेंट महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ मधून जवान भरती करते. भारताच्या चार light रेजिमेंट आहेत, त्यात गोरखा, मराठा,शीख लाईट, आहेत. मराठा ही एक अशी रेजिमेंट आहे त्याचे युध्दघोष एका महापुरुषाच्या नावावर आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात पराक्रम गाजवल्याबद्दल त्यांना दोन VC प्रदान करण्यात आले होते. या जवानांचे वैशिष्ट्य म्हणजे हे ताकदीने भारी, चपळ आणि उंचीने कमी असतात. ही रेजिमेंट Gorilla Warfare साठी खूप प्रसिद्ध आहे. 

महार  रेजिमेंट Mahar Regiment:
घोषवाक्य: यश सिद्धी
युध्दघोष:बोलो हिंदुस्थान की जय


श्रीलंकेच्या विजयानंतर 8 महार बटालियन 8 PVC म्हणून ओळखली जाते.
महार बटालियन च्या अधिकाऱ्याची बेरी

महार बटालियन भारतीय लष्कराची अशी एक रेजिमेंट आहे की , जिने स्वातंत्र्यानंतर भारतात मशीन गन रेजिमेंट हा महत्त्वाचा रोल बजावला कारण भारतीय सैन्यात याच बटालियन कडे मशिन गन चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. नन्तर प्रत्येक बटालियन कडे मशिन गन आल्या परंतु ह्या बटालियन चे महत्व काही कमी झाले नाही मशीन गन चालवण्यासाठी; ही रेजिमेंट भारताच्या सगळ्या भागातून भरती करते. ही रेजिमेंट भारताची पहिली ऑल क्लास रेजिमेंट आहे. तिने अनेक युद्धात भाग घेतला पण महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीत महत्वाची भूमीका, भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात तसेच नक्षलवादी विरुद्ध झालेल्या लढाईत महत्वाची भूमिका निभावली.
अजून माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या
       महार रेजिमेंट

जम्मू काश्मीर रायफल्स J & K Rifles:
घोषवाक्य: प्रशता ​​रणवीरता
युध्दघोष: दुर्गा माता की जय
बँड पथकातील जवान
परमवीर चक्र विजेते संजय कुमारह्या बटालियन चे कारगिल च्या लढाई च्या पराक्रम करण्यासाठी ओळखली जाते. ज्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले ते वीर योद्धा कॅप्टन विक्रम बत्रा:. Loc मध्ये अभिषेक बच्चन ने कॅप्टन ची भूमिका बजावली आणि याउलट लक्ष्य चित्रपटात सुभेदार मेजर यादव यांनी भूमिका हृतिक रोशन ने निभावली होती. ही रेजिमेंट जम्मू इलाख्यातून भरती करते. तसेच काश्मीर मधुन देखील करते. 

 Jammu kashmir Light Infantry Regiment जम्मू काश्मीर रेजिमेंट:
बोलो भारतमाता की जय
एक उच्च अधिकारी 


JAKLI चे जवान कसम परेड नंतर आपल्या परिवार बरोबर

    काश्मीर देशाला एक रेजिमेंट प्रदान करते तिचे नाव आहे जम्मू काश्मीर रेजिमेंट . ह्या रेजिमेंटचे सर्वाधिक जवान मुस्लिम समुदायातील असून काश्मीर चे रहिवाशी आहेत. ह्या बटालियन ला गेल्यावर्षी सर्वोच्च अशोकचक्र हा सन्मान प्रदान कऱण्यात आला होता. हा मरणोत्तर सन्मान नझीर अहमद वाणी यांना देण्यात आला. ह्या बटालियन ला शौर्य गाजवण्यासाठी सुभेदार बाणा सिंह यांना परमवीर चक्र देण्यात आले होते.

पुढील सदरात लष्कराच्या पायदळ बटालियन त्यांच्या सहायता करण्यासाठी दुसऱ्या कोणत्या सेना त्यांना मोहिमेदरम्यान मदत करतात याबद्दल माहिती देण्यात येईल.
जय हिंदही माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल ही आशा बाळगतो.
आणि आवडली तर शेअर करायला विसरू नका.
आपले GKinformation.info  सहर्ष आभारी आहे
आणि follow करायला विसरू नका..
धन्यवाद
Post a Comment

0 Comments