PVC Ram Raghoba Rane Brave Story...
          PVC Ram Raghoba Rane Brave Story...


तुम्ही भारतीय सेना दलांवरचे चित्रपट पाहिले असतीलच ना, त्यात सुनील शेट्टी, सनी देओल यांचे जोशातील चित्रपट, त्याबरोबर अंगावर काटा आणणारे युद्धप्रसंग या चित्रपटात असतातच ना...त्यानंतर  आता 2000 च्या नंतर काळात अक्षय कुमार, अजय देवगण, जॉन अब्राहम देखील या प्रकारचे चित्रपट प्रदर्शित करतात हो ना.. हल्ली नवे हिरो देखील देशभक्तीपर चित्रपटात झळकतात विकी कौशलचा URI सहजपणे आठवतो.तर युद्धप्रसंग म्हटलं तर बॉर्डर, LOC कारगिल, उरी the Surgical Strike, जमीन हे चित्रपट तुम्ही पहिलेच असतील की नाही.. पाहिलेच असतील कारण हल्ली TV सर्वांकडे आहे आणि त्यातल्या त्यात मोबाईलची भर पडलीच आहे की नाही बरोबर youtube आहेच...      तर अशा कथा चित्रपटातील हे प्रसंग  फेक प्रसंग म्हणू शकतो पण खऱ्या कथा ऐकल्यावर अंगावर काटा उभारल्याशिवाय राहणार नाही तर मी एका अशा योध्याची गोष्ट सांगणार आहे की, त्यांनी खरोखर युद्धाभूमीवर पराक्रम गाजवत, शत्रूला धडकी भरवून आपला पराक्रम सिद्धच केला. 


ही कहाणी आहे परमवीर चक्र विजेते राम राघोबा राणे यांची....
National War Memorial मधील पुतळा

         मी एकेदिवशी कॉलेज च्या ग्रंथालयात बसलो होतो.नेहमीप्रमाणे पेपर चाळत होतो. मला लष्कराबद्दल खूप आकर्षण होते, गेल्या  2-3वर्षात तो माझा मित्र आणि सिनियर देखील.. तर त्याचवेळी माझा एक कोकणी मित्र भेटला तोही पेपर वाचण्याच्या कामाने ग्रंथालयात आला होता. तेव्हा पेपर वाचल्यानंतर आमचा सहज पुलावामा चा विषय निघाला( कारण त्यावेळी पुलावामा हल्ल्याला एक आठवडा झाला होता). तेव्हा असेच मी त्याला विचारले की, तुमच्या घरातील कोण मिलिटरी मध्ये आहे का? त्याने लगेच उत्तर दिले.हल्ली कोणी नाही.पण माझा आजोबा होते लेफ्टनंट कर्नल डॉ. सावंत ( armoured Medical Corp's). त्याने सांगायला सुरुवात केली. त्याचे आजोबा भारतीय लष्करातील मेडिकल (AMC) विभागात होते.निष्णात सर्जन होते. दुसऱ्या महायुद्धात अनेक जणांचे प्राण वाचवले होते. त्याकाळी ते इस्पितळात ड्युटी वर असत. पण त्याकाळी अचानक युध्द परिस्थिती उदभवली.

ArmouredMedicalCorpslogo
जाणून घ्या;-भारतीय लष्कराच्या अशा काही रेजिमेंट्स ज्या युद्धभूमीवर पाऊल टाकताच शत्रूला गारद करू शकतात

 सांगायचं असं की,त्याकाळी देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. देश पारतंत्र्यातून मुक्त झाला... पण त्या काळात बॉर्डर वरून कारण देश स्वातंत्र्य झाल्यापासून पाकिस्तानच्या आजतागायत चालू आहेत त्यावेळी पण नापाक कारवाया चालू झाल्या होत्या.. युद्ध होतेय की काय असे वाटत होतं कारण स्वतंत्र अस्तित्व आल्यानंतर पाकिस्तानने काश्मीर वर हक्क दाखवायला सुरुवात केली. काश्मीर चा राजा हरिसिंग यांनी त्यांचे संस्थान भारताच्या हवाली केले आणि त्यातच पाकिस्तान  देशाने त्यांची दहशतवादी संघटना स्थापन केली..
     देश खूप तणावातून जात होता कारण फाळणी देखील झाली. इकडचेलोक तिकडे,तिकडचे इकडे हिंदू-मुस्लिम जात होते.. पाकिस्तानातून मृत्यूदेह तर रेल्वे भरून आले होते म्हणे असो; तो आजोबांची गोष्ट आपल्या मुखातून सांगत होता... मी आणि मित्र ऐकत होतो..त्याचे आजोबा डॉक्टर होते आणि त्यांनीच मेजर सरांवर उपचार केले.
    त्याने विषयाला न भटकून जाता सत्य स्थिती सांगायला सुरुवात केली.

Manoj Mukund Narvane. मराठमोळा जनरल....भारताचे दुसरे मराठी लष्करप्रमुख


     मेजर राणे कोल्हापूर जिल्ह्या जवळील कारवार येथील रहिवासी..शरीराने धिप्पाड गडी निदान 5फूट 8इंची इतका उंच असावा. त्यांनी सुमारे 22 व्या वर्षी ब्रिटिश इंडियन आर्मी जॉईन केली. तो काळ म्हणजे देशभक्ती चाच होता. देशात स्वातंत्र्य चे नारे दिले जात होते. राणे या देशभक्ती च्या वातावरणाने  भारावून गेले होते त्यांनी दोनच पर्याय ठेवले, करियर साठी.एकतर आंदोलनात भाग घ्यायचा आज दुसरा म्हणजे मिलिटरीत भरती व्हायचं..त्यांनी तेव्हा आपल्या वडिलांना विचारलं की, काय करू असे असतानाच.. त्यांच्या भागात लष्कराने भरती काढली होती.त्यांनी सहज देऊ असा विचार केला अन भरती झाले आणि ते लष्कराच्या इंजिनिअर सेनेच्या बॉम्बे snappers रेजिमेंट मध्ये नाईक पदावर रुजू झाले.. सुमारे 1940.त्यांचे भाग्य असं की त्यांना दुसऱ्या महायुद्धात भाग घ्यावा लागला. त्याचा पुढे 1947 च्या लढाईत खूप फायदा झाला असावा..ते दशकच भारतीय सैनिकांसाठी जिकिरीचे होते कारण ब्रिटिशांसोबत त्यांनी दुसरे महायुद्ध लढले.
 त्यांच्या प्रशिक्षणानंतर राणेंना 28 व्या फील्ड कंपनीमध्ये पोस्ट केले गेले होते. ते 26 व्या इन्फंट्री विभागाचे अभियंता होते. त्यावेळी ते बर्मा येथे जपानी लोकांशी लढत होते. त्यांना तेथील अर्कान मोहिमेवर पाठवण्यात आले होते परंतु दुर्दैवाने त्यांना अपयश मिळाले. तेव्हा, त्याच्या दोन विभागांसह, त्याच्या कंपनीच्या कमांडरने, बुथिडॉंग येथे मागे राहण्यासाठी सैन्याची प्रमुख सामग्री,दारुगोळा नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आले आणि रॉयल इंडियन नेव्हीने तेथून बाहेर काढले. उद्दीष्ट लवकरच प्राप्त झाले असले तरी अपेक्षित असे नुकसान करू शकले नाही झाले नाही. यामुळे राणे व त्याच्या माणसांना जपानी लोकांकडून गस्तीवर असलेल्या नदीत जाण्यासाठी आदेश दिले गेले. राणे आणि त्याच्या दोन विभागांसह, कुशलतेने जपानी सैन्यापासून दूर गेले आणि बहरी येथे 26 व्या पायदळ विभागात सामील झाले. त्यांच्या कृतींसाठी, त्यांची पदोन्नती हवालदार (सार्जंट) येथे झाली. युद्धानंतर राणे सैन्यात राहिले.  1947 मध्ये, देशाच्या स्वातंत्र्यानंतर, त्याने भारतीय सैन्यात स्थान बद्ध करण्यात आले आणि तेथील नायब सुभेदार हे पद मिळवले. त्यामुळे त्यांना त्यांच्या युद्ध अनुभवांवर तसेच त्याच्या चिकाटी आणि नेतृत्व गुणांसाठी, विभाजनापूर्वी राणे यांची शॉर्ट-सर्व्हिस कमिशनसाठी निवड झाली. १ डिसेंबर 1947 रोजी त्यांना दुसरे लेफ्टनंट  म्हणून अधिकृत रित्या त्यांना अभियंता कॉर्प ऑफ कमिशनमध्ये नियुक्त करण्यात आले. 
लष्करात त्याकाळी बटालियन मध्ये गॅझेट ऑफिसर म्हणून सेकंड लेफ्टनंट पदावर कमिशन भेटत असे; परंतु बदलत्या काळानुसार आता कमिशन लेफ्टनंट पदावर घेतले जाते.
  
त्याबरोबरच दुसऱ्या वेळी देखील अर्थात भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेच काश्मीर खोऱ्यात; त्याच काळात दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान लष्कराने मिळून काश्मीरवर अधिकार दाखवायला सुरुवात केली. त्याच वेळी सैन्याला अशी माहिती मिळाली की, पाकिस्तानने काश्मीर मधील नौशेरा सेक्टर मध्ये बॉम्ब mining केली आहे म्हणजे बॉम्ब पेरले आहेत तेही रस्त्यावर (नौशेरा सेक्टर आजदेखील अतिरेकी कारवाया करण्यासाठी कुख्यात आहे राष्ट्रीय रायफल्स इथे मोठया प्रमाणात तैनात असते तरीदेखील इथे हल्ले होत राहतात. आणि इथेच सैन्याचे खूप सैनिक शहीद होतात)... तो घाम पुसत सांगत होता आम्ही ऐकतच राहिलो होतो. त्याने पाणी पिऊन सांगायला सुरुवात केली.. सैन्यास ही माहिती भारतीय लष्कराला तेथील स्थानिक रहिवासी (जे बकरवाल अर्थात बकरी चरवणारे) म्हणून ओळखले जातात.
(बकरवाल समाज हा काश्मीर स्थित खोऱ्यात राहतो हा समाज वेळोवेळी सैन्यास रसद तसेच माहिती देखील पुरवतो. त्यासाठी ह्या समाजातील बऱ्याच जणांना सैन्याने सन्मानित केले आहे. एका व्यक्तीला पद्मश्री ने सन्मानित केले असून राष्ट्रीय रायफल्स च्या स्थापनेपासून सैन्यास खूप मदत झाली आहे . हा समाज गुर्जर community चा भाग आहे.)

ही माहिती लष्कराच्या सिग्नल कॉर्प्स ने ब्रिगेडियर कमांड पर्यंत माहिती पोहोचवली. ( सिग्नल कॉर्प्स सेनादलासठी माहिती पोहोचवणे अर्थात संदेशवहन करण्याचे काम यांच्याकडे असते.) ब्रिगेडियर कमांड ने लगेच या कमांड मधील कर्नल अधिकाऱ्यांना फोन वर संवाद साधला असता त्यांना समजले की , डोग्रा रेजिमेंट तेथील भागात तैनात आहे.
मुळातच डोग्रा लोक हे पहाडी प्रदेशातील असल्यामुळे ब्रिगेडियर साहेबांनी येथील चौक्यांचे काम डोग्रा बटालियन कडे सोपविण्यात आले. डोग्रा रेजिमेंट च्या भरती प्रक्रिया हिमालय प्रदेश, जम्मू काश्मीर भागातून पार पाडली जाते.

ही कामगिरी डोग्रा कडे सोपवल्यानंतर डोग्रा बटालियन लगेच  दुसऱ्या दिवशी आपल्या कामासाठी निघाली त्यांनी लगेचच search operation चालू केले कारण सैन्यास बॉम्ब mining बरोबर पाकिस्तानी सैन्य घुसल्याची माहिती पुरवण्यात आली.
 {तो इतके सविस्तरपणे सांगत होता कारण तो माझा मित्र देखील NCC मध्ये होता आणि त्याने त्याच वर्षी पुण्याच्या इंजिनिअर बटालियन च्या कॅम्प मध्ये होता.}

शेवटची इच्छा... ब्रिगेडियर पी एस गोथ्रा यांनी लिहिलेली सत्य कथा

तर लगेच डोग्रा बटालियन च्या कर्नल साहेबांनी तेथील मेजर, कॅप्टन ना सूचना करण्यात आली.आणि तिथे स्वतः 4th Dogra चे कर्नल बिष्ट आणि लेफ्टनंट कर्नल आर्या आले होते .त्यांनी बटालियन मधील सर्व कमिशंड ऑफिसर, सर्व JCO आणि NCO आणि जवान उपस्थित होते. सर्वांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. ज्यांना सुट्ट्या होत्या ते सर्व रेजिमेंट मध्ये परत आले होते. बटालियन ला प्लॅन समजवून सांगण्यात येणार होता. अधिकारी इंजिनिअर बटालियन ची वाट बघत थांबले होते. तेवढ्यात त्यांना गाड्यांचा आवाज आला आणि इंजिनिअर थोड्या वेळात पोहोचले. सेकंड लेफ्टनंट राणे उतरले त्यांनी कर्नल सरांना जोरात सॅल्युट मारला. चहाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना व बटालियन ला योजना आखण्यात आली....
दुसऱ्या दिवशी नौशेरा सेक्टर मधून निघाले.त्यांच्याबरोबर ASC( Armoured Supplier Corps)
ASC( Armoured Supplier Corps) या युनिट चे काम सैन्यास रसद पुरवणे असते, 

Anti-Ballistic Missiles - क्षेपणास्त्र विरोधीशस्त्र

मेडिकल corps
सैन्यातील डॉक्टर्स

बरोबर पाठवण्यात आली त्याबरोबरच EME रेजिमेंट ला पाठवण्यात आले.

( EME:- Electrical Mechanical Engineering हे विभाग सैन्यदलातील गाड्या दुरुस्ती बरोबर technical problem सुधार करण्यासाठी असते)
प्रसंगी हे युनिट सुद्धा लढाई करतात.
भारतीय सैन्याच्या मालवाहू गाड्या सैन्याबरोबर रसद घेऊन जाताना (जुना फोटो)

1 डिसेंबर 1947 मध्ये पाकिस्तान लष्कराने जिंकलेला झेंगर, भारतीय सैन्याने पुन्हा ताब्यात घेतला, जो नंतर नौशेरा सेक्टरमधून राजौरीकडे जाताना लागतो. 8 एप्रिल 1948 रोजी, चौथी डोगरा बटालियन राजौरीकडे गेली. आगाऊ दरम्यान, बटालियनने नौशेराच्या उत्तरेस अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्वालीच्या काठावर हल्ला केला आणि ताब्यात घेतला. बरवलीच्या पलीकडे बटालियनची आडमुठेपणा अडथळा ठरत होता. सहाय्यक टँक देखील अडथळे पार करण्यात अयशस्वी होत होते. तो प्रदेश पण डोंगराळ भाग होता 4th डोगरा बटालियनला संलग्न असलेल्या th 37 व्या assault फील्ड कंपनीच्या विभागाचे प्रमुख असलेले राणे यांना बटालियनसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी पाठविण्यात आले. राणेंनी आणि त्यांच्या टीमने मायनिंगफील्ड साफ करण्यास म्हणजे बॉम्ब डिफ्युज करण्यास सुरवात करताच, पाकिस्तानी लष्कराकडून आलेल्या मोर्टारच्या गोळ्याच्या माऱ्यात दोन जण मारले गेले आणि राणेंसह पाच जण जखमी झाले.

जाणून घ्या; सैन्यदलातील जांबाज अधिकाऱ्याची कथा
ग्रेनेड

राणगाड्याची साखळी चेन ही आताची लेटेस्ट आहे ही प्रसंगी झाडे, दगडे देखील पाडू शकते इतकी मजबूत असते.

सैन्यातील रणगाडे
असे असूनही, 8 एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत, राणेंनी आणि त्याच्या जिवंत माणसांनी मायफिल साफ केली {बरोबर AMC असल्यामुळे त्यांनी औषधोपचार केला}. ज्यामुळे समर्थक रणगाडे आणि वाहने पुढे सरकल्या. पुढे रस्ता अजूनही धोकादायक असल्याने टाक्यांसाठी सुरक्षित रस्ता तयार करावा लागेलं; या भागात पाकिस्तानी सैन्यास अद्याप साफ केले नव्हते. ही लेन रात्रीतून राणेंनी तयार केली. दुसऱ्या दिवशी, त्याच्या विभागातील खाणी आणि अडथळ म्हणजे मोठे दगड, मोठमोठी, झाडे साफ करण्यासाठी बारा तास सतत काम केले. रस्ता सामोरे जाणे अद्याप अवघड असल्याने त्याने बटालियनला पुढे जाण्यासाठी मार्ग बदलला. पाकिस्तानकडून सतत  तोफखान्यांचा मारा सुरू असतानाही राणेंनी हे काम चालू ठेवले होते.
नवीन तंत्रज्ञान युक्त artillery
त्यातच त्यांचा ड्राइवर घायाळ झाला होता. उरलेल्या सैन्याने मिळून 10 एप्रिल रोजी राणे पहाटे 3ला लवकर उठले आणि आदल्या रात्री साफ न झालेल्या अडथळ्याचे काम पुन्हा सुरू केले. दोन तासांच्या आतच त्याने खाणी आणि मशीन-बंदुकीच्या आगीत पाच मोठ्या पाइन झाडांचा रस्ता अडविला.
काश्मीर खोऱ्यातील पाईन वृक्ष
यामुळे चौथी डोगरा बटालियनला अजून एक मोठा अडथळा होईपर्यंत तेरा किलोमीटर पुढे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग मिळाला. पाकिस्तानी सैन्याने जवळच्या डोंगरांवर वस्ती केली होती आणि ब्लॉककडे जाण्याच्या सर्व पध्दतीवर गोळीबार करण्यास रस्ता साफ होता. त्यामुळे त्याचा नाश त्रासदायक बनला होता. रात्री संपण्यापूर्वी रस्ता उघडत असताना, राणेंनी रस्त्यावरील टँकला रस्त्यावर रोखले आणि टाकीच्या मागील बाजूस कव्हर घेतला. दुसर्‍याच दिवशी, राणेंनी चिंगास जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यासाठी आणखी तीन तास काम केले,त्यामध्येच त्यांचे आणखी दोन जवान आणि एक बडी घायाळ झाला होता त्यातील एकाचा मृत्यू झाला. डोग्रा बटालियन साठीचा रस्ता खुला झाला ,जो कि जुन्या मुघल मार्गावर आणि त्यापलीकडे राजौरी आणि नौशहर दरम्यान अर्धा मार्ग आहे. ही कारवाई करत असताना राणे खूप असे जखमी झाले होते. ते वाचतील की नाही ही गोष्ट खुणावत होती. पण तरीही AMC विभागाने वेळीस गांभीर्य ओळखुन त्यांना श्रीनगर येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यांना खूप रक्त स्त्राव झाला होता.तरीही सुदैवाने वाचले. त्यांच्या operation झाले त्यात मित्राचे आजोबा मुख्य सर्जन पैकी एक होते. त्यांच्या देखभालीत ही कथा त्यांना स्वतः राणे साहेबांनी सांगितली. नंतरच्या काळात 8 ते 11 एप्रिल या काळात त्यांनी राजौरीच्या भारतीय आगाऊ कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांनंतर त्यांना मेजर पदापर्यंत धडक मारली . त्यांच्या कार्यामुळे केवळ 500 सैन्य आणि बरेच जखमी पाकिस्तानी सैन्यच चुकले नाही तर त्या भागातील अनेक नागरिकांना चिंगास व राजौरीपासून वाचवले.
PvC Ram Rachana Rane  यांच्या या अतुलनीय शौर्य, साहस आणि पराक्रमी कामासाठी त्यांना लष्कराचा सर्वोच्च सन्मान 'परमवीर चक्र' या पदकाने सन्मानित करण्यात आले....
माझ्या मित्राचे आजोबा त्याकाळात खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांनी सविस्तरपणे मित्राने सांगितले. आजोबांदेखील COAS ने सन्मानित केले होते.

Marathi Highest Army officers


कौटुंबिक पार्श्वभूमी:--
त्यांची मुलगी वेगळ्या क्षेत्रात त्यांच्यापेक्षा वकिली व्यवसायात असून व्यवसायाने वकील आहे आणि ती अमेरिकेत कार्यरत आहे.. त्यांच्या मुलगा त्यांच्याप्रमाणे लष्करी परंपरेने सैन्यात त्यांच्याच रेजिमेंट मध्ये आहे.
 
                 INS khanderi Submarine|

ही माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल ही आशा बाळगतो.
आणि आवडली तर शेअर करायला विसरू नका.आणि कमेंट करायलाही...
आपले GKinformation.info  सहर्ष आभारी आहे
आणि follow करायला विसरू नका..
धन्यवाद

    

Post a Comment

0 Comments