भारतात सापडलेला कोरोनाव्हायरस वेगळा आहे का? संशोधकांची मागणी.

भारतात सापडलेला कोरोनाव्हायरस वेगळा आहे का? संशोधकांची मागणी.

चीनमध्ये पसरला हंता व्हायरस जाणून घ्या 👈


         आपण जर भारताची लोकसंख्या पाहिली तर अजून अमेरिका व इटलीच्या तुलनेत भारतात कोणाचा प्रसार कमी झालेला आहे त्यामुळे जगभरात भारताविषयी अनेक चर्चा सुरू आहेत.


         जगभरात असलेला कोरोना व भारतातला कोरोनाव्हायरस वेगळा आहे का? असा प्रश्न तमिळनाडू राज्याला पडला आहे. संपूर्ण देशात तब्लिकिंशी संपर्कात आलेल्या बहुतेक कोरोना बाधित पेशंट्समध्ये कोरोनाची लक्षणेच आढळून आली नाहीत, त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. म्हणूनच तामिळनाडू राज्याने या बदलत्या व्हायरसचा संशोधन व्हावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

         कोरोनाव्हायरस चा कहर जगभरात वाढत असून पण भारताची लोकसंख्या पाहता अजून तरी अमेरिका व इटलीच्या तुलनेत भारतात कोणाचा प्रसार कमी आहे. जगभरात भारतात कोरोनाचा प्रसार कमी का आहे त्याची तीन कारणे सध्या प्रचलित आहेत ती म्हणजे -

१. बीसीजी
२. हायड्रोक्झीक्लोरोक्वीन
३.  व तापमान

        भारतात ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत अशांची तपासणी केली तर तीन टक्के प्रायव्हेट मधून 0.2% पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या आशियाई देशांमध्ये कोरोनाचा आकडा कमी आहे याची कारणं काही तज्ञांना कोरोनाचे काही वेगळे प्रकार आहेत का असं वाटत आहे.


 त्यामुळेच ओपन सोर्स वेबसाईट नेक्सस्टाईन या वेबसाईट वरून जाऊन तज्ञ लोकं शोध घेत आहेत. ही वेबसाइट म्हणजे जगातल्या विषाणूच्या संदर्भातील एक महत्त्वाचे सोर्स आहे. या वेबसाईटच्या माहितीनुसार दिसून आले आहे की कोरोनाव्हायरसचे 10 - 20 वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे काही वेगळे व्हायरस नाही तर त्यामध्ये काही थोडासा बदल झालेला आहे. सायंटिफिक भाषेत त्याला म्यूटेशन म्हणतात.


      जरी हे व्हायरस थोडे वेगळे असले तरी ते कमी घातक नाहीत. त्यामुळे कोरोनाव्हायरस बद्दल हा प्रश्न तमिळनाडू सरकारला पडला आहे की या वायरसचे दहा ते वीस आणखीन प्रकार असावेत. पुण्यातल्या NIV  (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी ) ने या विषाणूचा अभ्यास केलाय. त्यांनी 881 कोरोना पेशंटचे सॅम्पल तपासल्यावर हा रिपोर्ट आय एम एस (इंडियन मेडिकल सायन्स) मध्ये प्रकाशित केलाय. चीनच्या वुहान शी तुलना करता भारतातल्या व्हयरस मध्ये 99.99% टक्के साम्यता आहे.

      सध्या कोरोना मध्ये जे बदल होत आहेत तो स्ट्रेन नाही. स्ट्रेन म्हणजे व्हायरसचा उपप्रकार पण त्यातील सूक्ष्म बदलामुळे सुद्धा जगभरात या व्हायरस वर एकच लस वापरता येईल का याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

   अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जाऊन माहिती मिळवा:-

काय आहे कोरोना व्हायरस ?चीनमध्ये वेगाने पसरणारा कोरोना व्हायरस Corona संरक्षक कवच (CoronaVirus update) : N95 Mask आणि Face Mask,(Corona virus)PPE kit.

Post a Comment

0 Comments