Maharashtra - Marathi Army Officers

Maharashtra - Marathi Army Officersआपल्याला माहीत असेल की महाराष्ट्राने देशाला मोठे मराठा साम्राज्य दिले. याबरोबरच पराक्रमी योद्धे देखील दिले. पण आपल्याला मी या सदरात महाराष्ट्राने देशाला दिलेले सर्वोच्च अधिकारी या सदरात सांगणार आहोत.

जनरल अरुणकुमार वैद्य( General A K vaidya)
अरुण कुमार वैद्य हे मूळचे अलिबागचे, रायगड जिल्ह्याचे रहिवासी; यांचा प्रमुख सहभाग खालिस्तान वाद्यांविरुद्ध झालेल्या ऑपरेशनमध्ये होता. त्या वेळी भारताचे थल सेना प्रमुख होते. दुर्दैवाने त्यांची खलिस्तान वादयाने त्यांची पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची हत्या करण्यात आली होती


हे वाचा 👉 Mahar Regiment {Indian Army}


लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात पाटील lieutenant General Shankarrao thorat patil   ( KC,पद्मश्री)शंकरराव थोरात पाटील हे मूळचे कोल्हापूरचे भारतीय लष्करातील कलवरी इन्फंट्री मध्ये त्यांचे कमिशन झाली होते. यांचा कलवरी रेजिमेंट प्रमाणे महार रेजिमेंट मध्ये देखील महत्त्वपूर्ण काम केले. महार रेजिमेंटचे ऑल क्लास भरती प्रक्रिया सुरू करण्यात ते तेव्हा लेफ्टनंट जनरल आणि कर्नल ऑफ रेजिमेंट या पदावर असताना त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांना खूपशा युद्धाचा अनुभव होता. ब्रिटिश भारतीय लष्करात ऑपरेशन कांगो दुसरे महायुद्ध यामध्ये महत्वपूर्ण सहभाग.लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर lieutenant general rajendra nimbhorkar
ते सध्या भारतीय लष्करात सेवा निवृत्त अधिकारी आहेत. त्यांचे कमिशन यातील भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंट मध्ये लेफ्टनंट या पदावर झाले होते. ते मूळचे विदर्भाचे; त्यांचा सर्जिकल स्ट्राइक ह्या भारतीय लष्कराच्या मोहिमेत महत्त्वाचा सहभाग होता.

ब्रिगेडियर सुधीर सावंत: 
सुधीर सावंत यांचे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षण झाले त्यांचे कमिशन 6 बटालियन ऑफ मराठा लाईट इन्फंट्री मध्ये झाले होते . ते लोकसभेचे खासदार राहिले , असून त्यांनी वेळोवेळी संसदेमध्ये सैनिकांचे प्रश्न मांडले.स्टेशन ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार होते.

परमवीर चक्र विजेते राम राघोबा राणे:ते भारतीय लष्कराच्या इंजिनिअर बटालियन मध्ये फर्स्ट शिफ्ट नाईट लेफ्टनंट या पदावर रुजू झाले होते. त्यांचा 1947 च्या युद्धात महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी त्याविरोधात हाताने स्वतःचे बॉम्ब उध्वस्त केले. त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त 12 अधिकारी-शिपाई होते. तेवढे जणांनी मिळून पाकिस्तानी
सैन्याचे रणगाडे उध्वस्त केले. त्यासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. ते ब्रिगेडियर या पदावरून निवृत्त झाले.
  सविस्तर पणे वाचण्यासाठी:👉राम राघोबा राणे शौर्यकथा
 Manoj Narvane:-

दुसरे मराठमोळे सेनाप्रमुख म्हणून नरवणे सर खूपच eligible , अनुभवी अधिकारी होते कारण प्रदीर्घ 40 वर्षांच्या कालावधीनंतर यांनी सेनाप्रमुख पद भूषवले. त्यांनी अगोदर लष्कराच्या इस्टर्न कमांड चे नेतृत्व केले आहे. इस्टर्न कमांड सुमारे 4000 किमी ची सीमा आहे.. त्यांना सर्जिकल strike इत्यादी खूप अनुभव आहे.. ते 31 डिसेंबर ला पदभार स्वीकारला.
अजुन माहितीसाठी क्लिक करा:👇👇
                 लष्करप्रमुख नरवणे यांच्याविषयी
लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर:-
लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर त्यांचे पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांच्या समवेत

    माधुरी कानिटकर ह्या भारतीय सैन्य दलातील पहिल्या मराठी महिला आहे की जिने लेफ्टनंट जनरल ह्या पदापर्यंत धडक मारली आणि सैन्यदलात ह्या तिसऱ्या महिला व्यक्ती आहेत  की त्यांनी भारतीय सैन्यदलात एवढ मोठं पद भूषवले. ज्या अशा पहिल्या अधिकारी आहेत ज्यांनी padriatic nephrology ही मेडिकल सेवा सैन्यदलास उपलब्ध करून दिली. त्या पुण्याच्या मिलिटरी मेडिकल कॉलेज च्या डीन राहिल्या असून, त्या पंतप्रधान विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन सल्लागार समिती च्या सदस्या आहेत.

हे वाचा 👇

आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya ) एअरक्राफ्ट कॅरियर


ही माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल ही आशा बाळगतो.
आणि आवडली तर शेअर करायला विसरू नका.
आपले GKinformation.info  सहर्ष आभारी आहे
आणि follow करायला विसरू नका..
धन्यवादPost a Comment

0 Comments