कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १.७० लाख कोटींचा मदतनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1.70 लाख कोटींचा मदत निधी ?कोणत्या क्षेत्राला किती मदत मिळणार आहे? जाणून घेऊया.काय आहे कोरोना व्हायरस ?चीनमध्ये वेगाने पसरणारा कोरोना व्हायरस 


COVID 19 (कोरोना) आजारामुळे समाजातील, शहरातील खेड्यांमधील, जनतेला मोठा फटका बसणार आहे. विशेषता शेतकरी, कामगार, कर्मचारी व पेन्शनवर जगणाऱ्या व्यक्तींना विशेष आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1.70 लाख कोटी रुपयांचा मदतनिधी घोषित केला आहे. हा निधी वेगवेगळ्या भागांमध्ये विभागला आहे. त्याचा फायदा विशेषता देशातील गरीब लोकांना होईल.

चीनमध्ये पसरला हंता व्हायरस जाणून घ्या 👈
तर पाहूया कोणत्या क्षेत्रासाठी किती निधी राखून ठेवण्यात आला आहे?

१) शेतकरी :-
देशातील जवळजवळ ८.69 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८.69 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जातील.

२) MGNREGA (मनरेगा) कामगारांसाठी :-
मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम. मनरेगाच्या कामगारांचे वेतन कामाच्या हिशोबाने प्रत्येकी सरासरी दोन हजार रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याचा फायदा जवळपास पाच कोटी कुटुंबांना होईल.

३) पेन्शनर, दिव्यांग व विधवांसाठी :-
देशातील तीन कोटी पेन्शनर दिव्यांग व विधवा त्यांना प्रत्येकी हजार रुपये दिले जातील. ही रक्कम तीन महिन्याच्या कालावधीत दोन टप्प्यांत थेट खात्यात जमा केली जाईल.

४) महिला जनधन खातेधारक :-
जनधन खाते असणाऱ्या महिलांना पुढील तीन महिने प्रत्येकी पाचशे रुपये दिले जातील ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होईल याचा फायदा 20 कोटी महिलांना होईल.

५) महिला बचत गट :-
महिला बचत गटा मधून दिला जाणारा कोलॅटरल फ्री लोन याची रक्कम 10 लाखांवरून 20 लाख म्हणजेच दुप्पट करण्यात आली आहे. कोलॅटरल फ्री म्हणजे कर्ज घेताना वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. सध्या देशात 63 लाख बचत गट आहेत जवळपास पाच - सात कोटी कुटुंब या बचत गटांना जोडले गेले आहेत.

६) कर्मचारी :-
मालक व कर्मचारी यांचा पुढचा ३ महिन्यांचा EPF (भविष्य निर्वाह निधी) भारत सरकार देणार आहे. व हे प्रमाण १२ टक्के एवढे आहे. हे काही  निकषांवर अवलंबून आहे. जसे की की ज्या कंपनीत 100 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात आणि 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कर्मचारी 15 हजाार पेक्षा जास्त पगार घेतात अशा कंपन्यांनाच याचा फायदा मिळणार आहे.
दुसऱ्या योजनेचा ८० लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कर्मचारी provident फंडाच्या काहि नियमांमध्ये बदल होणार आहे. आता कर्मचारी त्यांच्या जमा रकमेच्या ७५% इतकीच रक्कम किवा ३ महिन्यांचा पगार यात जी रक्कम कमी असेल, तितकाच न परतीचा अकास्मित खर्चासाठी advance घेतला असेल.

७) बांधकाम मजुरांसाठी:-
बांधकाम मजुरांसाठी ३१,००० कोटींचा निधी उभारण्यात आला आहे.  हा निधी बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी कसा वापरायचा या कामात केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करणार आहे. याचा फायदा जवळपास ५ कोटी कामगारांना होईल.

८) याव्यतिरिक्त देशातील गोर - गरीबांना ३ महिने मोफत राशनगॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.Corona संरक्षक कवच (CoronaVirus update) : N95 Mask आणि Face Mask,(Corona virus)PPE kit.


कारोनाच्या लढाईत सामील होऊन काटेकोर बंद पाळा व सरकारला साथ द्या.🙏🙏
वरील योजनांचा फायदा नक्की घ्या.
ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.

Post a Comment

0 Comments