भारतीय लष्कराच्या जवानांची युद्धकथा....

भारतीय लष्कराच्या जवानांची युद्धकथा....    


 मला वाटतं मी 2018 साली एका ncc चा कॅम्प केला होता. कॅम्प काहीसा मोठा असावा कारण मोठ्या प्रमाणात एका ग्रुप ची मुले हजर होती. ती पण ज्युनिअर कॅडेट्स ते सिनियर कॅडेट्स, आपल्याला कदाचित माहीत असेल की,ncc चे तीन सर्टिफिकेट असतात त्यातले ज्युनिअर A ग्रेड साठी आणि B आणि C साठी सिनियर कॅडेट्स अर्थात हे लोक 11वीच्या पुढेच्या वर्गातील असतात असो;  त्या कॅम्प साठी वेगवेगळ्या रेजिमेंट मधून PI स्टाफ होता. त्यामध्ये 1लेफ्टनंट कर्नल दर्जाचा अधिकारी तसेच 1 मेजर मॅडम 1 सुभेदार आणि बाकी ज्युनिअर कमिशन चे अधिकारी होते. तर एके दिवशी असेच lecture चालू होते.सर आम्हांला नकाशा वाचन हा विषय शिकवत होते. तोवर एक सहा फूट उंचीचा,धिप्पाड ,गौर वर्ण असलेला अधिकारी हॅट घालून मस्त गॉगल घालून ऐटीत चालत आला, तो अधिकारी म्हणजे कर्नल A.K.Singh. ते दरवाज्याच्याआतून येतात
तोपर्यंत त्यांना सलाम ठोकायला चालू झाला.."राम राम साब"असे शब्द उच्चारत कडक बुटांचा आवाज येत होता. तसे पहायला गेलं तर कर्नल साहेब बिनधास्त, मनमिळाऊ, कनिष्ठ लोकांचा आदर करणारा व्यक्ती. येताच तो थेट माईक जवळ जाऊन धडकला. कॅडेट्स नि त्यांचे स्वागत केले..."Good Morning sir'.. सरांनीही स्मितहास्य केलं आणि रिप्लाय दिला आणि बसण्यास सांगितले. तोच सरांना कळून चुकले होते, की मुले रोज तेच lecture ऐकून कंटाळलेत, तो सरांनी आर्मी संबंधित प्रश्न विचारायला चालू केली. त्यामध्येच अर्धा तास गेला. तोवर सर भानावर आले आणि सरांनी प्रश्न हा केला की, मुलांनो तुम्हाला ऑपरेशन म्हणजे माहिती आहे का? तोवर मुलांच्या डोक्यात वेगवेगळे विचार  येण्यास सुरू झाले. अरे ऑपरेशन म्हणजे अरे आपण ऑपरेशन हा शब्द सर्रास ऐकतो नाही का, हो!की नाही, शेजारील अमुक्याचे तमुक्याचे भाषण ऐकतो की नाही, असा मुलांमध्ये गोंधळ चालू झाला. सरांना परिस्थिती लक्षात येताच सरांनी सावधान हा हुकूम सोडला. सरांचे शब्द कानावर पडताच मुले गप्पच.    सरांनी मग ऑपरेशन बद्दल सांगण्यास सुरुवात केली. आपल्याला ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन विजय वगैरे बद्दल माहीतच असेल, तुम्ही चित्रपटांमध्ये हे पहिलेच असेल ना, तर ऑपरेशन हे लष्करात दहशतवादी किंवा शत्रूला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात केली जातात. बहुतेक वेळा काश्मीर सारख्या ठिकाणी हो का बरं! मग सरांनी स्वतःची ओळख देत हे सर्व सांगायला सुरुवात केली, सर तसे मूळचे पर्वतीय प्रदेशातील त्यांचे खानदानचं लष्करातील त्यांचे वडील लष्करात रणगाडा रेजिमेंट मध्ये मेजर ह्या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या वडिलां चा इंडो - पाक युद्धात सहभाग होता. त्यांनी युद्धात बॉम्ब फेकताना बॉम्ब हातावर फुटून ते कायमचे अधू झाले होते. सर 1998 साली भारतीय लष्कराच्या UPSC मार्फत दिलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या 2 वर्षाच्या कठोर परिश्र मानंतर भारतीय लष्करातील  ग्रेनेडीयर बटालियन मध्ये पर्मनंट कमिशन दिले गेले. त्यांनी दोन वर्षे कोलकाता, मुंबई, गोवा या ठिकाणी सेवा केली होती. नंतर लष्कराने त्यांना बढती देऊन JK मधील राजौरी या भागावर नेमणूक केली. आपल्याला माहीत असेलच पुंछ, द्रास, कारगिल, नौशेरा, राजौरी हे भाग म्हणजे चक्क अतिरेक्यांचे निवासस्थान इथे रोज बॉम्बस्फोट, दगडफेक, सैन्यावर गोळीबार मोठ्या प्रमाणावर होतात.तरीही भारतीय सैन्य तिथे ताठ मानेने अभिमानाने आपली सेवा देत असते. असो  राजौरी भागात येताच सर सांगतच होते, की सर एक दिवस रिलॅक्स झाले आणि दुसऱ्या दिवशी पोस्टिंग चा एरिया दाखवण्यात आला. तो भाग भयानक च होता. तिथे जंगले,नद्या, दऱ्या इ प्रदेशाचा भाग होता. सरांनी अजून 2- 3 दिवस भाग अभ्यासून घेतला. काय काय घडते याची माहिती त्यांना त्यांच्या बडीने दिली. सर एके दिवशी दुपारी दमून आले होते निवांत आपल्या तंबूत चहाचा आस्वाद घेत बसले होते. तोवर हेड क्वार्टर मधून त्यांचा वायरलेस खनखनला. कर्नल साहेबांचा संदेश होता. त्यांना नुकतीच IB कडून माहिती मिळाली की, राजौरी भागात अतिरेकी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयवर बॉम्ब हल्ला करण्याचा प्लॅन आहे. आणि त्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आणि त्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांना यमसदनी पाठवण्याचा आदेश देण्यात आला. सरांनी संध्याकाळी च आपल्या टीम सोबत गुरख्यांना विचारणा केली. तेव्हा त्यांना सुमारे 10 लोकांचा ग्रुप असल्याची माहिती मिळाली. असे सांगितले की, त्यांनी चक्क चार दिवस झोप न घेता ऑपरेशन केले होते,  ते अतिरेकी एकदम दुर्गम भागात लपले होते. त्यांच्या कडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा, आरडिक्स तसेच रॉकेट launcher इ. साहित्य होते. त्यांना शोधण्यातच रात्र गेली. सकाळी कंपनी ने एका गहूच्या शेताची कापणी पहिली होती. आणि तेथील वस्तीवरून किंचाळण्याचा आवाज येत होता. त्यांच्या कंपनी ला कळून चुकले की, इथेच अतिरेकी लपले आहेत. अतिरेकी देखील सैन्याकडे लक्ष ठेवून होते, अतिरेक्यांना जवळ येतायत अशी चाहूल लागताच त्यांनी सैन्यावर अंधाधून असा गोळीबार करण्यात आला. तोवर सैन्याने झाडांचा दगडाचा आधार घेत त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. सैन्य पण काही मोठया प्रमाणात नव्हते ती कम्पनीत 8-9 च लोक होते. खूप काही तास ही चकमक चालू होती. दोन तीन तासाच्या अथक प्रयत्न नंतर लष्कराने 2 दहशतवादयांना कंठस्नान घातले. आणि एकाद्वारे चकमक चालू ठेवत बाकी जणांनी पळ काढला.परंतु त्यावेळेस लष्कराला ते 10 नसून 30 जणांचा ग्रुप होता हे निदर्शनास आले. लष्कराने त्यालाही यमसदनी धाडण्यात आले परंतु त्यावेळेस तिथे वेगळीच परिस्थिती होती कारण दहशतवादयांनी तिथे न कळत RDX लावला होता. RDX चालू करून ते तेथून पळून गेले. लष्कराच्या एका जवानाने निष्क्रिय करून त्याला खोलून फेकण्यात आला. त्याची Range सुमारे 500M होती याचा अर्थ की त्या शेतकऱ्याचे शेत तसेच घर देखील जळून खल्लास झाले असते. असो;
दुपारी तंबू ठोकून जेवण करून घेतले आणि  सिग्नल ने त्यांना असं समजण्यात आले की, अतिरेकी त्याच गावातील सफरचंदाच्या बागेत लपून बसले आहेत , सैन्याने जेवून घेत त्यांनी डोंगरावर सरांनी रॉकेट launcher ने मारा चालू केला ह्या माऱ्यात तब्बल 10-12 अतिरेक्यांना कंठस्नान घातले त्यातील सुमारे 5 जण गंभीर जखमी झाले. तरीही सैन्याला 3 दिवसांत ऑपरेशन ओके करण्याचा आदेश असल्याने त्यांनी बाकी निसटून गेलेलं 10 जण परत   दुसऱ्या डोंगरावर लपून बसले होते परंतु सुदैव असे की, सर्व सैनिक पहाडी ईलख्यातील जवान होते त्यांनी दुर्बिणीतून अंदाज लावत सुमारे रात्री 12 वाजता फायरिंग चालू झाली . यामध्ये जवळपास सर्वांचा नायनाट झाला. सरांनी ईशवराचे आभार मानले. तरीही ऑपरेशन ओके झाले ना त्यावेळी पहाटे पाच वाजले होते. मग तरीही सकाळी सरांनी दात घासण्याच्या वेळेस सर असेच चूळ भरत होते. आणि पाहतोतर काय समोर काळा वेशातील एक बंदूकधारी मेजर कडे बंदूक रोखून येत होता. सरांना देखील काही सुचे ना! सरांची रिव्हॉल्व्हर खाली होती ति काढेपर्यंत गोळीबार झाला सरांनी पाहतो तर काय, समोर दहशतवादी मृत्युमुखी पडला. तर त्याला बडीने मारले सरांनी थँक्यु बोलत बडीला धन्यवाद दिले. आणि अशाप्रकारे सरांचे ऑपरेशन डन झाले . या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती कलाम यांच्या हस्ते त्यांना सेना पदक देण्यात आले अशाप्रकारे ऑपरेशन संपन्न झाले.  हे शब्द ऐकताच कॅडेट्स कडून मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवून सरांचे अभिनंदन केले आणि मुलांना एक अभिमान आला की, आपण एका शूर अधिकारीच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प करत आहोत याचा खूप आनंद झाला.

Anti-Ballistic Missiles - क्षेपणास्त्र विरोधीशस्त्र


जवानांना, अधिकाऱ्यांना मानाचा मुजरा 🇮🇳🇮🇳⚔⚔
जय हिंद. 🇮🇳🇮🇳⚔⚔ 

Post a Comment

0 Comments