चीनमध्ये नव्याने पसरलेला हंता व्हायरस....

चीनमध्ये नव्याने पसरलेला हंता व्हायरस(Hanta virus)Hanta virus in Chinaचीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगात घातलेला धुमाकूळ आपण पाहिला. हीच परिस्थिती सुधारत नाही तोच चीनमध्ये एका नवीन व्हायरसचे आगमन झाले आहे. या व्हायरसच नाव आहे हंता(Hanta virus). चीनमध्ये हंता व्हायरसमुळे काही लोकांचा जीव गेल्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. लोकांमध्ये या व्हायरसमुळे भितीचे वातावरण पसरले आहे. पण, हा विषाणू खरच जीवघेणा आहे का ? तो भारतात येऊ शकतो का ? तो कसा पसरतो या प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेऊ.
Corona संरक्षक कवच (CoronaVirus update) : N95 Mask आणि Face Mask,(Corona virus)PPE kit.


सर्वात महत्वाचे म्हणजे हंता हा काही नवीन विषाणू नाही. तो अनेक वर्षांपासून अस्तित्वात होता. या व्हायरसमुळे हंता वायरस पल्मनरी सिंड्रोम हा आजार होतो. कोरोनाव्हायरस प्रमाणे हा व्हायरस हवेमार्फत पसरत नाही. हा आजार खार, व उंंदीर या प्राण्यांच्या लाळ, मल यांच्या  संपर्कात आल्यानेच पसरतो. महत्त्वाचे म्हणजे तो दुसऱ्या कोणत्याही मार्गाने पसरत नाही. म्हणजेच, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे तो पसरूच शकत नाही.

हंताची लक्षणे काय असतात ?
तर थकवा, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे, पोटात दुखणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. तर खोकला व श्वास घेण्यास अडचण होणे ही नंतरची लक्षणे आहेत जी उपचार न केल्यास दिसून येतात.

Hanta virus

हंतावर उपचार काय आहेत ?

या आजारावर एकच उपचार नाही. पण उपचार कसे करावयाचे याचे नियम आहेत. संसर्ग होणाऱ्या व्यक्तीला लगेच एमर्जन्सी कक्षात ठेवण्यात येते आणि ऑक्सिजन थेरपी वापरली जाते. जर एखाद्या रुग्णाला तापाबरोबर रक्तस्त्राव होत असेल व मूत्रपिंडाचा आजार असेल तर, त्याला निरीक्षणाखाली ठेवले जाते. काही केसेसमध्ये पेशंटना डायलिसिसची गरज पडू शकते.

तर वाचकांनो हंता विषाणू बद्दल ज्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका. हा आजार भारतात येेणं जवळपास अशक्य आहे. सध्या आपण सर्व लॉकडाऊन करून घरी राहून कोरोनाव्हायरस संपवूया.
Post a Comment

0 Comments