Donald Trump visit to India. डोनाल्ड ट्रम्प - भारत दौऱ्यावरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प - भारत दौऱ्यावर        अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यावर पहिल्यांदा भारतात येत आहेत. ते पत्नी मेलानिया ट्रम्प च्यासोबत २४-२५ फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी एकीकडे जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेच्या तयारीसाठी अमेरिका व भारताच्या गुप्तचर संघटनांनी युद्धस्तरावर तयारी सुरू केली आहे कारण ट्रम्प विश्वातील सर्वात शक्तिशाली राजनेता आहेत तर सहाजिकच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. ट्रम्प यांची द बीस्ट ही कार अगोदरच भारतात पोहोचली आहे

        अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत भेटीसाठी आपल्या कारकिर्दीचे अखेरचे वर्ष निवडले. 2017 मध्ये ट्रम्प यांनी बारा दिवसांचा विक्रमी असा आशिया दौरा करताना दक्षिण कोरिया, चीन, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि जपान यांना भेट दिली होती पण, त्यामध्ये भारताचा समावेश नव्हता.


          2018 मध्ये ट्रम्प यांनी भारतीय प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास नकार दिला होता याचा अर्थ की 'भारत अमेरिका संबंधांत तणाव निर्माण झाला होता' असे नाही. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उभय नेत्यांत विविध पातळ्यांवर अनेकदा भेटी झाल्या. मोदींच्या अमेरिकेतील 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात ट्रम्प सहभागी झाले होते. थोडक्यात भारताशी चांगले संबंध असले तरी अमेरिकेच्या "टॉप प्रायोरिटी" मध्ये भारत नव्हता. पण आता त्यांच्या आगामी भेटीमुळे चित्र बदलेल असे अनेकांना वाटत असून अमेरिके विषयीच्या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात वाढल्या आहेत.
       


ट्रम्प यांच्या दौर्‍यात व्यापार करार नाही     

       भारत दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताने आम्हाला फारशी चांगली वागणूक दिली नाही अशी खंत व्यक्त करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मात्र कौतुक केले. अमेरिकेतील हवाई तळावर माध्यमांशी संवाद साधताना भारत भेटीत व्यापार होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प - आम्हाला आताही भारतासोबत मोठे करार करता आले असते परंतु मी हे सर्व निर्णय भविष्यासाठी राखून ठेवत आहे.
विमानतळ ते प्रत्यक्ष कार्यक्रमाची  जागा या दोन्ही दरम्यान सत्तर लाख लोक असतील असे मोदींनीच मला सांगितले आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम बद्दल देखील लोकांच्या मनात कुतूहल आहे हे खरोखरच खूप उत्साहवर्धक असून मी आशा करतो की तुम्हीही याचा नक्की आनंद घ्याल.Post a Comment

0 Comments