Vidnyan shap ki vardan|Vidnyan shap ki vardan Marathi nibandh


Vidnyan shap ki vardan|Vidnyan shap ki vardan Marathi nibandh


Vidnyan shap ki vardan               तर Vidnyan shap ki vardan हा माणसाला पावलोपावली पडणारा प्रश्न आहे. खरतर विज्ञान ही ही एक कामधेनु गाय माणसावर प्रसन्न झाली व त्याच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आले. विज्ञान हे एका परिसासारखे आहे परीस म्हणजे एक काल्पनिक दगड ज्याने कोणत्याही वस्तूला स्पर्श केला कि ती वस्तू सोन्यामध्ये रूपांतरित होते.
      
                विज्ञानाच्या साह्याने माणसाने चाकाचा शोध लावला त्यानंतर माणसाच्या जीवनाला गती आली. अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने ज्ञानाच्या शाखा रुंदावल्या.
सध्याचे युग हे संगणीकरणाचे युग आहे या एकविसाव्या शतकात दळणवळण व माहिती तंत्रज्ञान हे अफाट विस्तारले आहे. मोबाईल तर संदेश वहनाची खाण आहे. मेसेज, ई-मेल, फेसबुक, व्हाट्सअप यामुळे सातासमुद्रापलीकडे जग जवळ आले आहे. आरोग्य, शिक्षण, औद्योगिकीकरण या क्षेत्रांमध्ये क्रांती घडून आली आहे. अंधश्रद्धेपासून अलिप्त असा नवा समाज निर्माण झाला.  
याचं उदाहरण म्हणजे गॅलिलिओ - गॅलिलिओने जेव्हा दुर्बिणीचा शोध लावला तेव्हा त्याने आपल्या मित्रांना गुरु या ग्रहाचे आणखीन तीन उपग्रह दुर्बिणीतून पाहण्यास सांगितले. तेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये ॲरिस्टॉटल ने जे सांगितलेले आहे तेच मानले जात. ॲरिस्टॉटल ने जे सांगितले नाही तेे या जगात शक्यच नाही अशी त्याच्या शिष्यांची समज होती. त्यांच्या मते अरिस्टोटल हा एक प्रकांड पुरुष होता.

त्याला "He is the master of all who knows" असेदेखील म्हटले जायचे.

त्यामुळे जेव्हा गॅलिलिओने आपल्या मित्रांना दुर्बिणीतून पाहण्यास सांगितले तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी त्याला ते गुरुची तीन उपग्रह असून तुझ्या दुर्बिणी वरील तीन डाग आहेत असे सांगितले. गॅलिलिओने काच पुसून पाहण्यास सांगितले असता त्यांनी तुझ्या डोळ्यां मध्ये काही बिघाड झाला आहे असे सांगितले. 
                 भारताने आतापर्यंत चांद्रयान 12, मिशन मंगळ यान, गगन यान यांसारख्या अंतराळ मोहिमा राबवल्या आहेत. एडिसनने विजेचा शोध लावला व मानवाच्या जीवनात प्रकाश आला. इंटरनेटच्या माध्यमातून तर जगातील कोणतीही माहिती एका क्षणात मिळवता येते.
         
            आर्टिफिशिअल इंटेलिजन्स  च्या सहाय्याने मानवाने कम्प्युटर सिस्टम, रोबोटिक सिस्टम तयार केले आहे. यामध्ये भारत सरकारने वार्षिक बजेट मध्ये 7500 करोड रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोटर कार्स, एरोप्लेन, बुलेट ट्रेन यामुळे प्रवास अधिक जलद झाला आहे. रेडिओ, टीव्ही, व्हिडिओ गेम्स, मोबाईल, इंटरनेट यांचा उपयोग मनोरंजनासाठी केला जातो. Vidnyan shap ki vardan:-


गुन्हेगारी नियंत्रणा साठी देखील विज्ञानाचा उपयोग केला जातो. म्हणजेच जेनेटिक इंजीनियरिंग, कंम्प्युटर सिस्टम, हॅकिंग सिस्टम यांचा उपयोग सायबर क्राईम, डीएनए मॅच करणे, खुनाचा तपास करणे यासाठी केला जातो. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अलीबाबा, मिंत्रा यांसारख्या कंपन्यांमुळे बाजारातील कोणतीही वस्तू घरापर्यंत मिळणे शक्य झाले आहे. हे सर्व विज्ञानाचेच चमत्कार आहेत. पण तेव्हाच आठवण होते विज्ञानातून मिळाल्या तोट्यांची.

             विज्ञानाने शोधलेल्या यंत्रांनी शारीरिक कष्टाचे महत्त्व नाहीसे झाले व माणूस आळशी बनला. जलद जीवनशैलीत आवश्यक व्यायाम, अन्नाचा ताळमेळ, निसर्गाचे सानिध्य सर्व काही हरवून बसला. औद्योगिक क्रांतीचे रूपांतर प्रदूषण रुपी राक्षसात केले गेले. वनांची व वन्यजीवांची कत्तल करून निसर्गाचा समतोल बिघडला गेला. अणु बॉम्ब ्चा वापर मानवाने महायुद्धात केला. विविध शस्त्रास्त्र बनवली गेली. संरक्षणासाठी बनवलेल्या शस्त्रास्त्रांचा उपयोग युद्धासाठी केला जातो. जर चौथे महायुद्ध झाले तर जग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. रस्ते व हवाई वाहतुकीचे अपघातांची संख्या वाढली. इंटरनेट सायबर सिक्युरिटीची गरज वाढली. बाबा महाराजांनी विज्ञानाचा वापर करून लोकांना चमत्कार दाखवून आणले व पैसे लुटले. उदा. आसाराम बापू, सत्यसाईबाबा, राधे मा. इ.
       

              मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने जे मिळवले आहे त्यातून स्वतःचाच विनाश ओढवून घेतला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा पडणारा प्रश्न म्हणजे  Vidnyan shap ki vardan.

Post a Comment

0 Comments