The beast - Donald Trump's car. डोनाल्ड ट्रम्प यांची कार द बीस्ट. काय आहे खासियत ?डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांची कार द बीस्ट(The Beast)


      ट्रम्प यांची द बीस्ट(The Beast) ही कार अगोदरच भारतात पोहोचली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांची खास कार द बीस्ट सर्व अत्याधुनिक सुविधा व हत्यारांनी परिपूर्ण आहे ज्याची गरज कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये पडू शकते. याचबरोबर यामध्ये राष्ट्रपतींच्या सुविधांची सुद्धां पूर्ण काळजी घेतली जाते राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी विशेष प्रकारची बनवलेली ही कार दोन दिवसांपूर्वी अमेरिका वायुसेनेच्या विशेष विमानातून अहमदाबादला पोचली आहे. द बीस्ट जशी भारताच्या रस्त्यावर उतरली सोशल मीडिया पासून न्यूज चॅनेल्स व न्युज पेपर यांमध्ये तिचीच चर्चा होत आहे. ही कार जिथून जिथून गेली तेथे लोक या अद्भुत गाडीकडे एक टकाने पाहत राहिले.
        सध्या या गाडीला विशेष सिक्युरिटी मध्ये ठेवले गेले आहे. सांगितलं जातंय की डोनाल्ड ट्रम्प व त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प अहमदाबाद एअरपोर्टवर उतरल्यानंतर याच गाडीतून भारताचा दौरा  करतील. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की ट्रम्प यांची की कार जेवढी खास आहे तेवढाच खास गाडीचा ड्रायव्हर सुद्धा आहे.ट्रम्प यांची ही कार विशेष प्रशिक्षण प्राप्त केलेला एक कमांडो ड्राईव्ह करतो जाणून घेऊया काय आहेत द बीस्ट व तिच्या ड्रायव्हर ची वैशिष्ट्ये.


   "14 वाहनांच्या मध्ये चालते द बीस्ट"

        आपली मजबुती अत्याधुनिक शस्त्रास्त्र व अनेक शैलींच्या सोबत द बीस्ट एक चालता-फिरता बंकर आहे. चार वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्रपती बनले तेव्हा या गाडीला विशेष करून त्यांच्यासाठी डिझाईन केलं गेलं होतं. ट्रम्प जेव्हा कोणत्याही दुसर्‍या देशाच्या दौऱ्‍यावर जातात तेव्हा या कारचा उपयोग केला जातो. दुनियातील सर्वात सुरक्षित कार असून सुद्धा ही गाडी 14 वाहनांच्या ताफ्यात चालते. या गाडीवर कोणत्याही गोळीचा खतरा नाही आणि कोणत्याही बॉम्बचा इफेक्ट होऊ शकत नाही त्याचबरोबर ही कार कोणत्याही प्रकारच्या केमिकल अटॅक्सचा सामना करू शकते इथपर्यंत की न्यूक्लियर अटॅक सुद्धा झेलण्याची क्षमता आहे. ही गाडी खास अमेरिकी कमांडो ड्राईव्ह करतो त्याला जवळजवळ कोणतेही हत्यार चालवायचे प्रशिक्षण दिलेले असते व तो जवळच्या लढाईत सुद्धा पारंगत असतो. त्याचे प्रशिक्षण असे असते की तो कोणत्याही स्थितीत ड्राइव्ह करू शकतो. जीपीएस युक्त गाडीमध्ये ड्रायव्हर च्या सीट खाली कम्युनिकेशन सिस्टम ने परिपूर्ण पूर्ण कंट्रोल रूम असतो.


या गाडीला अशा प्रकारे बनवले गेले आहे की प्रत्येक सीट केबिन सारखी वापरले जाऊ शकते. कारमध्ये ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त सात ते आठ लोकांच्या बसण्याची जागा असते. कारमध्ये प्रवासाच्या दरम्यान राष्ट्रपतींकडे कित्येक प्रकारचे खास रिमोट कंट्रोल असतात प्रेसिडेंट च्या सीटला सॅटेलाइट फोन लावलेला असतो त्याच्या मदतीने ते उपराष्ट्रपती व डायरेक्ट पेंटागनशी बोलू शकतात. त्याव्यतिरिक्त गाडीत एक पेनिक बटणऑक्सिजन सप्लाय असा एक कंट्रोल बटन असतो. या गाडीच्या खिडक्या कधीच उघडत नाहीत फक्त ड्रायव्हर साईडची खिडकी 3इंच उघडते. कार पंक्चर झाल्यावर सुद्धा तेवढ्याच स्पीडने धावते. शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी ही कार मशीन गननाईट विजन कॅमेरा सारख्या टेक्नॉलॉजीने सक्रिय आहे. या गाडीची किंमत जवळजवळ दहा करोड रुपयांपेक्षा अधिक आहे.

Post a Comment

0 Comments