Corona virus. काय आहे कोरोना व्हायरस ?

काय आहे कोरोना व्हायरस ?
चीनमध्ये वेगाने पसरणारा कोरोना व्हायरस 
           ज्या व्हायरसने चीनमध्ये आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला आहे व जवळजवळ 2000 लोकांना याची लागण झाली आहे त्या कोरोना व्हायरस बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

            या व्हायरसमुळे चीनमधून जगभरात प्रवासी करणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. कारण या भागातून दुसऱ्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या ज्या व्यक्तींना  ह्या आजाराची लागण झाली असेल यांच्याद्वारा दुसऱ्या देशात सुद्धा तो पसरला जाऊ शकतो. भारतानेद्धा आपल्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनर द्वारे तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर भारतातून चीनमध्ये प्रवास करणाऱ्या  व्यक्तींनादेखील खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. व विशेेष काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
           
 भारत व चीन या दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात संपर्क असल्यामुळे भारताला या व्हायरस बद्दल चिंता करण्याची गरज आहे. हा वायरस एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरत असल्यामुळे भारतातच नव्हे तर पूर्ण जगात हा व्हायरस पसरण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे 24 जानेवारी हा दिवस चीनमध्ये "चिनी नवीन वर्ष" म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या निमित्ताने चीनमध्ये गेलेल्या लोकांना किंवा प्रवाशांना हा आजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.काय आहे कोरोना व्हायरस?जाणून घेऊया या व्हायरस बद्दल.

कोरोना व्हायरस हा विषाणूंचा मोठा गट आहे. हा आजार  Severe  Acute Respiratory System(SARS)  आजाराशी मिळताजुळता आहे. SARS आणि कोरोना व्हायरसच्या अनुवंशिकतेत 80 % समानता आढळून आली आहे. निपाह नंतर हा एक नवीन मोठा आजार आहे जो सध्या चीनमध्ये पसरत आहे. चीनने याला "वूहान" व्हायरस असे नाव दिले आहे. यापूर्वी हा आजार चीनमध्ये 2002 आणि 2012 या वर्षांमध्ये पसरला होता. आतापर्यंत या  व्हायरसने 56 निष्पाप लोकांचा जीव घेतलाा असून 2000 जणांना याची लागण झाली आहे.
पहिल्यांदा हा व्हायरस चीनच्या एका मासळीबाजारातून पसरला होता. व सुरुवातीचे संशयित रुग्ण हे याच भागातील मासळीबाजारातील विक्रेतेग्राहक होते. सध्या या बाजाराला बंद करण्यात आले असून त्याचे शुद्धीकरण करण्यात आले आहे.संसर्ग कसा टाळावा:-

               गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, स्वच्छ व ताजे अन्नाचे सेवन करा, तीन-चार दिवस ताप न गेल्यास तपासणी करून घ्या. म्हणजेच, कोणत्याही व्हायरसचे इन्फेक्शन आपल्याला होऊ नये यासाठी आपण काळजी घेतो ती घ्या.

या आजाराचे उपचार काय आहेत:-

                अजून पर्यंत कोरोना वायरस बद्दल पूर्ण माहिती मिळाली नाही त्यामुळे आतापर्यंत यासाठी कोणते विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. या आजाराची लक्षणे काही दिवसात निघून जाऊ शकतात यावर उपचार म्हणून भरपूर पाणी पिणे, झोप घेणे व विश्रांती घेणे हे उपाय सुचवले आहेत.आजार कसा पसरतो?
                  जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने सांगितल्याप्रमाणे MERP हा आजार उंटांमधून  तर SARS
हा आजार मांजरी मधून आला आहे. हा आजार माणसांमध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क आल्यानंतर पसरतो. खोकला, स्पर्श, शिंक यातून हा आजार पसरतो. संसर्गित व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर हाताने, नाक, तोंड, डोळे यांना स्पर्शातून हा आजार पसरतो. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.

कोरोना वायरस ची लक्षणे काय आहेत?
                  या व्हायरसची लक्षणे निमोनिया, ताप येणे, श्वासात अडथळा, थंडी वाजणे, सर्दी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात ही लक्षणे काही दिवसांपर्यंत टिकून राहतात. लक्षणे तीव्र असल्यास तपासणी करून घेणे आवश्यक आहे. भारतामध्ये केरळ राज्यात या व्हायरसचा पहिला संशयित व लागण झालेला रुग्ण आढळला आहे. चीनमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याला व्हायरसची लागण झाली असून भारतात आल्यावर हे निष्पन्न झाले. सध्या त्याच्यावर उपचार चालू आहेत.तुम्हाला ही माहिती आवडल्यास या आजाराबद्दल माहिती इतरांना देखील शेअर करा.

Post a Comment

1 Comments