India's 71th republic day celebration. भारताचा ७१ वा गणतंत्र दिवस संपन्न


भारत 26 जानेवारी 2020 रोजी साजरा करणार 71 वा गणतंत्र दिवस

भारताचा 71 वा गणतंत्र दिवस संपन्न

पॅरा कमांडो

गणतंत्र दिवसाचा इतिहास:- भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा अवलंब केला आणि 2 जानेवारी 1950 रोजी लोकशाही, सरकारच्या अंमलबजावणीनंतर अमलात आली. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून निवडण्यात आला. कारण हा दिवस 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या घोषणेने पूर्ण स्वराज्य, ब्रिटिश राजवटीने दिलेले वर्चस्व असलेल्या राज्याच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जाहीर केले होते.

मद्रास contingent

राजपथ परेड समारोह:-
भारताचा 71 वा  गणतंत्र दिवस रविवारी सकाळी संपन्न झाला. सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडेअकरा वाजेपर्यंत राजपथ वर परेड समारंभ सोहळा पार पडला. संचलनपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे शहिदांना पुष्पहार अर्पण करून राष्ट्रध्वज फडकविला. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती अशोक चक्रकीर्ती चक्र असे पुरस्कार प्रदान केले जातील. 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारतातील वाढती लष्कर शक्ती, समृद्ध संस्कृती, विविधता, सामाजिक - आर्थिक प्रगती यांचे प्रदर्शन केले गेले.
प्रजासत्ताक दिन 2020 साठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ब्राझील चे राष्ट्रपती श्री जैर बोल्सोनारो यांना रिपब्लिक डे परेड 2020 साठी आमंत्रित केले होते.

एअर फोर्स marching contingent


या वर्षीच्या परेड मधील विशेष बदल:-

  • यापूर्वी बिटींग द रिट्रीट सेरेमनी मध्ये अबाईड विथ मी हे गाणे वाजवले जायचे परंतु या वर्षीपासून या गीता ऐवजी वंदे मातरम हे गीत वाजवले जाईल.
  • यावर्षी गणतंत्र दिवस परेड मध्ये पहिल्यांदाच चिनुकअपाचे हेलिकॉप्टर यांना सामील केले गेले आहे
  • देशातील पहिली महिला कॅप्टन तान्या शेरगील ने भारतीय सेनेच्या तुकडीचे नेतृत्व केले आहे.
  • सीआरपीएफ दलातील महिला या वर्षी 26 जानेवारीच्या मोटर बाईक स्टंटमध्ये सामील होणार आहेत.
  • घनुष गन सिस्टम पहिल्यांदा परेड मध्ये सहभागी झाली.
  • DRDO ने पहिल्यांदा अँटी सॅटेलाइट वेपन ची लॉन्चिंग राजपथ परेड मध्ये केली.

DRDO प्रणाली-अँटी सॅटेलाइट वेपन

विशेष आकर्षण :-


 १.या वर्षी सर्जिकल स्ट्राइक नंतर पहिल्यांदा ५ पॅराशूट कमांडो रेजिमेंट म्हणजेच प्यारा कमांडो यांना परेड मध्ये सामील केले गेले आहे.
 2. आर्मीच्या युद्ध शस्त्रांची देखील संख्या वाढवण्यात आली आहे.
 3. वायुसेने मधील विमानांच्या ताफ्यात वाढ करण्यात आली आहे.
 4. सध्या वादात असणाऱ्या (द सॉल्ट) राफेल फायटर जेटला यावर्षी तरी गणतंत्र दिवस परेड मध्ये सामील केले गेले नाही.


BSF Camel contingent


भारतमातेसाठी शहीद झालेल्या सर्व सैनिकांना GK INFORMATION कडून भावपुर्ण श्रध्दांजली.
आपणास प्रजासत्ताक दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा.

जय हिंद.


ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा.

Post a Comment

0 Comments