Horse power to Mumbai police. मुंबई पोलिस दलाला हॉर्स पॉवर

मुंबई पोलिस दलात देशातील चौथे अश्वारूढ पथक दाखल
मुंबई पोलिस दलात प्रशिक्षित घोड्यांचा समावेश झाल्यामुळे त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारतात सध्या चेन्नई मैसूर आणि कोलकाता पोलीस दलाकडे असे अश्वदल असून आता मुंबई पोलिसांचा  यात चौथा क्रमांक लागला आहे. तब्बल 88 वर्षांनंतर मुंबई पोलिसांचे अश्वदल माऊंटेड पोलीस नावाने पुन्हा कार्यरत होणार असल्याची माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रजासत्ताक दिनी अश्वदलाचे संचलन होणार असून त्यासाठी शिवाजी पार्कमध्ये जोरदार सराव सुरू आहे.
येत्या काही महिन्यात मुंबईच्या रस्त्यांवर अश्वारुढ पोलीस दिसणार आहेत सध्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनासाठी शिवाजी पार्क मैदानात त्यांची तयारी सुरू आहे. आक्रमक जमाव पांगवणे, गर्दी वर बारीक लक्ष ठेवणे, आणि वाहतूक नियंत्रणासाठी मुंबई पोलिस आता घोड्यांवरून गस्त घालताना दिसतील. सहा महिन्यात तीस घोडेस्वार मुंबई पोलिस दलात कार्यरत होणार आहेत. 

आपत्कालीन स्थितीमध्ये तसेच एखाद्या कार्यक्रमांमध्ये जमलेल्या गर्दीवर वरून नजर ठेवणे सोयीचे जाते. माऊंटेड पोलीस युनिट त्यासाठी उपयोगी आहे. येथे घोड्यावर बसलेल्या पोलिसाला वेगळी उंची मिळत असल्याने त्यांना गर्दीवर लक्ष ठेवणे सोयीचे जाते त्याला माऊंटेड पोलीस असे म्हणतात. भारतामधील चेन्नई, मैसूर आणि कोलकत्ता पोलीस अशावेळी यांचा वापर करतात. मॉस्को, न्यूयॉर्क यांसारख्या अनेक शहरांचे पोलिसही अशा घोड्यांचा वापर करतात. त्याच धर्तीवर मुंबई पोलीसही तीस तीस घोडे खरेदी करणार आहेत. त्यासाठी सशस्त्र पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 सुरुवातीला मरोळ मधील कोळे कल्याण याठिकाणी घोड्यांना ठेवण्यात येणार आहे. त्यांची देखभाल करण्याचे कंत्राट एखाद्या संस्थेला देण्यात येणार असून अश्व खरेदी आणि इतर सर्व प्रक्रियेसाठी अंदाजे एक कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे.


 मुंबईतील वाढलेली रहदारी पाहता माउंटेन पथकाद्वारे महोत्सव, मोर्चे आधी प्रसंगी पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसून परिस्थितीवर लक्ष व नियंत्रण ठेवणे शक्‍य होणार आहे. गर्दीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारी अरेरावी, चोरी आदींवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी असे पथक प्रभावी ठरेल. रायडर घोड्यावर स्वार असल्यामुळे उंचावरून गर्दीवर लक्ष ठेवून काही गैरप्रकार घडत असल्यास तिथे वेगाने जाणे शक्य होणार आहे. पायी चालणाऱ्या 30 पोलिसांइतकी प्रभावी कामगिरी 1 अश्वस्वार पोलीस करू शकेल. गरज असल्यास पुढे नागपूर, पुणे आदी शहरांतही हॉर्स माऊंटेड युनिट सुरु करण्याचा विचार आहे.

काही विशेष
  • अश्व दलाचे प्रजासत्ताक दिनी संचलन
  • मॉस्को आणि न्यूयॉर्क पोलिसांचेही अश्व दल
  • 88 वर्षानंतर मुंबई पोलिसांचे माऊंटेड पोलीस युनिट
  • सहा महिन्यात तीस घोडेस्वार मुंबई पोलिस दलात दाखल
  • पोलीस उपनिरीक्षक सहायक निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
  • सण - महोत्सव, सभा, मोर्चे आदी प्रसंगी गर्दीवर लक्ष.
Manish malhotra
बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मलोत्राचे डिझाईन
बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी मुंबई पोलिसांच्या हॉर्स माऊंटेड पथकाचा गणवेश तयार केला आहे. त्याबद्दल मुंबई पोलिसांनी ट्विट करून मनीष मल्होत्रा चे आभारही मानले आहेत. निळ्या रंगाचा गणवेश लंडनच्या शाही गार्डसच्या युनिफॉर्मच्या धर्तीवर बनवण्यात आला आहे. त्याच्या टोपी वरही विशेष काम करण्यात आले आहेत.
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय."
ही पोस्ट आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा व जास्तीत जास्त शेअर करा.

Post a Comment

0 Comments