Howdy modi हाउडी मोदी :- अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभावी कार्यक्रम

हाउडी मोदी :- अमेरिकेत  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभावी कार्यक्रम

                अमेरिकेच्या यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा HOWDY मोदी हा एक प्रमुख कार्यक्रम होता. HOWDY मोदी हा शब्द How Do you do Modi याचा संक्षिप्त रूप आहे. अमेरिकेतील सर्वात मोठे प्रांत टेक्सासच्या (ह्युस्टन) शहरात NRG स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन टेक्सास इंडिया फोरम( TIF )द्वारा एक हजारपेक्षा अधिक Hollentiers च्या मदतीने 22 सप्टेंबर रोजी केला गेला. यामध्ये सामील होण्यासाठी पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांनी नोंदणी केली होती. Howdy मोदी हा अमेरिकेतील पंतप्रधान मोदी यांचा तिसरा मोठा कार्यक्रम होता. यापूर्वीचे कार्यक्रम 2014 मध्ये मेडिसन स्कॉयर वर आणि 2016 मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये आयोजित केले होते. Howdy मोदी हा कार्यक्रम या दृष्टीने ऐतिहासिक कार्यक्रम होता कारण पोपच्या कार्यक्रमा व्यतिरिक्त एवढी विशाल उपस्थिती अमेरिकेमध्ये आजपर्यंत अन्य कोणत्याही कार्यक्रमात बघितली गेली नव्हती. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशांच्या लोकांसाठी आयोजित या कार्यक्रमांमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती यांच्या व्यतिरिक्त अमेरिकन काँग्रेसचे अनेक सदस्य, गव्हर्नर व सर्व सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित होते.


            विशाल जनसमुदायाला संबोधित  करताना पंतप्रधान मोदी बोलले की ह्यूस्टन मध्ये एक नवीन इतिहास रचला गेला आहे आज भारताला "एक दृढ संकल्पित देश" सांगून त्यांनी सांगितलं की एक नवीन आणि चांगल्या भारताच्या निर्माणासाठी कठीण परिश्रम घेतले जात आहेत. मागील पाच वर्षांच्या एनडीए सरकारवर टीका करताना ते बोलले कि या पाच वर्षांत एकशेतीस करोड भारतीयांसाठी अशा उपलब्धता मिळवल्या गेल्या आहेत की ज्यांची कोणीच कल्पना करू शकत नाही. या संदर्भात सरकारद्वारा घरात गॅस कनेक्शन प्रदान करणे, ग्रामीण स्वच्छतेचे सुधारणा, ग्रामीण सडक भक्कमता निर्माण करणे, बँक खाते उघडणे इत्यादी बद्दल केल्या गेलेल्या परिवर्तनकारी कारवाईचा उल्लेख त्यांनी केला. इज ऑफ लिविंग आणि इज ऑफ बिझनेसच्या प्रती सरकारने केलेल्या कामांचे वर्णन त्यांनी केले. इज ऑफ लिविंग सुनिश्चित करण्यासाठी सरकारद्वारा केल्या गेलेल्या विभिन्न पहेलू जसे अप्रचलित कायद्यांना हटवून टाकणे, सेवांमध्ये गती आणणे, स्वस्त डेटा दर, भ्रष्टाचारा विरुध्द कडक कारवाई व जीएसटी यांना रेखांकित करत त्यांनी सांगितलं की आमच्या सरकारचा विकास प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचेल.अनुच्छेद 370 बद्दल बोलताना प्रधानमंत्री यांनी उपस्थित लोकांना अपील केली की, अशा वेळी कारवाई करण्यासाठी सांसदांना उभे राहून धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी सांगितले की अनुच्छेद 370 ने जम्मू-कश्मीर व लडाखच्या लोकांना प्रगतीपासून दूर ठेवले होते  या अनुच्छेद बदलामुळे जम्मू-काश्मीरच्या आणि लडाखच्या लोकांना एका भारतीया समान अधिकार मिळाले आहेेत. आतंकवादाची निंदा करताना प्रधानमंत्री यांनी सांगितलं की आतंकवादा विरुद्ध कडक  कारवाई आणि समर्थन करणाऱ्यांविरुद्ध देखील कठोर कारवाई केली जात आहे. आतंकवादाविरुद्ध लढ्यातील ट्रम्प यांच्या कामगिरीची देखील त्यांनी प्रशंसा केली.

तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा
आवडल्यास नक्की कमेंट करा व शेअर करा.

Post a Comment

0 Comments