The great maratha worries. मराठ्यांचा झेंडा अटकेपार भाग - 2

      मराठ्यांचा (Maratha) झेंडा अटकेपार भाग -2

Marathyancha (Marathas) Zenda atakepar


         मागच्या भागात आपण पाहिले मराठ्यांचा झेंडा अटकेपार ... भाग -१ की मराठ्यांनी अटेकवर भगवा कसा फडकवला. या भागात आपण या पुढील प्रसंग पाहूया.

         रघुनाथराव पेशवा इतक्यातच थांबला नाही. आजपर्यंत धर्मपंडितांच्या अनैतिक नियमांमुळे कधीही कोणत्या भारतीयाने अटके पुढे जाण्याचा निर्णय घेतला नव्हता, परंतु नानासाहेबांनी रघुनाथरावांना स्पष्ट आदेश दिल्यावर राघोबाने आपली सेना पेशावरला पाठवली. तुकोजी होळकरसाबाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठे पेशावरपर्यंत गेले आणि तेथून त्यांनी तैमूर शहा अब्दालीला पळवून लावले. म्हणजेच मराठा साम्राज्याचा भगवा अटकेपार गेला या पराक्रमाची आठवण म्हणून "मराठ्यांचा झेंडा अटकेपार"(Marathas) असे देखील म्हटले जाते.


पण रघुनाथरावाला अटकेमध्ये राहण्यास कोणताही रस नव्हता व त्याला पेशावरच्या पुढे अफगाणिस्तान मध्येही जायचे नव्हते. त्याला पुण्याचं राजकारण आठवत होतं त्यामुळे या जिंकलेल्या प्रदेशाची नीट व्यवस्था न लावता राघोबादादा पुण्यात परत आला. इतर मराठा सरदार देखील आपल्या मुलकापासून इतक्या दूर राहण्यास खूश नव्हते. मल्हारराव होळकर ने दत्ताजी शिंदे याला पंजाब प्रांताचा सुभेदार केला. पुढे दत्ताजी सुद्धा जास्त काळ इथे टिकला नाही. त्याने साबाजी शिंदे पाटील याला पेशावरच्या किल्ल्याची जबाबदारी दिली.

पुढे जेव्हा अहमदशहा अब्दाली आपली दुप्पट सेना घेऊन परत आला तेव्हा अटकेवर त्याला थांबवण्याची ताकद तेथील सरदारांनी दाखवली नाही. पुढे पानिपतचा (Panipat) इतिहास तर आपल्याला माहीतच आहे. अब्दालीनंतर शिख साम्राज्याने अटकेवर वर्चस्व निर्माण केलं, इंग्रजांनी त्यांना हरवून अख्खा वायव्य प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या फाळणीमुळे हा भाग पाकिस्तान प्रांतात सामील झाला. 1978 मध्ये पाकिस्तान सरकारने याचे नाव अटक खुर्द असे केले. व सध्याचा अटक किल्ला पाकिस्तान आर्मीच्या ताब्यात आहे जिथे स्पेशल ऑपरेशन फोर्स तैनात केली गेली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हटवून जेव्हा परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचा लष्करशहा बनला होता तेव्हा त्याने नवाज शरीफ याला अटकेच्या किल्ल्यात कैद करून ठेवले होते.


 म्हणूनच अटकेपार भगवा झेंडा फडकविला गेल्या अटकेच्या किल्ल्याचे राजकीय महत्त्व देखील कमी झालेले नाही.


पानिपतच्या(Panipat) रणसंग्रामात  शहीद झालेल्या सर्व मराठ्यांना GK  Information कडून अभिवादन.
तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा व मराठा साम्राज्याचा इतिहास सगळीकडे पसरवा.

छत्रपती शिवाजी महाराज: चरित्र, इतिहास आणि प्रशासन

Post a Comment

0 Comments