The great maratha warriors. मराठ्यांचा झेंडा अटकेपार भाग -1

मराठ्यांचा (Marathas) झेंडा अटकेपारMarathyancha Zenda atakeparMaratha Empire - worriors
मराठा(Maratha) ध्वज
आपण लहानपणापासूनच मराठ्यांचा झेंडा अटकेपार असे ऐकले असेलहा त्यावेळच्या मराठा साम्राज्याचा पराक्रमाचा कळस मानला जातो अनेक पुस्तकांमध्ये देखील अटके पासून रामेश्वर पर्यंत पसरलेले मराठा साम्राज्याच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत मग सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे अटकेपार म्हणजे नेमके काय?

तर अटक हे भारताच्या उत्तरेस सिंधू नदीच्या किनार्‍यावरील एक गाव आहे. पुराणात देखील या शहराचा उल्लेख केला गेला आहे. आज आपण ज्याला अफगाणिस्तान म्हणून ओळखतो तो पूर्वी गांधार देश म्हणून ओळखला जायचा कारण कौरवांची आई म्हणजेच गांधारी ही या देशाची राजकन्या होती. तेथेच हिंदुकुश पर्वतरांग यांचा खडतर प्रदेश आहे आणि येथूनच जर भारतात यायचे झाले तर हिंदुकुश पर्वतामधली खैबरखिंड नावाची खिंड ओलांडून यावे लागत असे.

अटकेचा किल्ला

सोन्याची चिडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आपलं नशीब आजमवायला येणारे अनेक व्यापारी युद्धे व आक्रमक शत्रू हे याच खैबर खिंडीतून यायचे. खैबर खिंडीचा शेवट हा पेशावर या गावी होतो.पेशावर पासून जर खाली उतरून आलो तर हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे अटक ग्रीसचा महान योद्धा अलेक्झांडर सिकंदर हासुद्धा याच अटक मधून सिंधू नदी ओलांडून भारतात घुसला होता.

पूर्वीच्या काळी भारतात समाज होता की भारताची सीमा ही सिंधू नदी पर्यंतचा हे भारताची भूमिका ही नेहमी पासुनच कोणत्याही देशावर आक्रमण करण्याची होती किंवा हिंदू धर्मात सुद्धा ही सीमा ओलांडण्याची परवानगी नव्हती म्हणूनच बाहेरच्या देशात आक्रमण करण्यासाठी भारतातून कोणीही जात नसते अटक म्हणजे भारताच्या सीमेतवरचे गाव अशी समज होती.

Maratha Empire - worriors


असं म्हणतात की बादशहा अकबर ने याला अटक असे नाव दिले अटक म्हणजे अडथळा.अकबर नटक मध्ये सिंधू नदीच्या तीरावर किल्ला बांधला या जागेचे महत्त्व लक्षात घेऊनच या किल्ल्याची उभारणी केली गेली होती हा किल्ला अफगाणिस्तान मार्गे भारतात येणाऱ्या परकीय आक्रमकांवर बंदी घालण्यासाठी उभारण्यात आला होता त्याची जिम्मेदारी पंजाबच्या सुभेदाराकडे होती.

भारताच्या पश्चिम सीमेवरील सर्वात महत्वाचे ठिकाण अटक हा किल्ला बनला अफगाणिस्तानमधून बंगाल पर्यंत जाणारा ग्रँड ट्रंक रोड देखील याच मार्गे जात होता.अठराव्या शतकात मुघलांचे अटकेवर वर्चस्व होते पण जेव्हा अहमदशहा अब्दाली हा अफगाणिस्तानचा सुलतान बनला तेव्हा त्याने पंजाबच्या सुभेदाराच वर्चस्व मोडून काढलं. त्याच काळात भारतातील मोघल सत्ता देखील खिळखिळी झाली होती याचा फायदा घेऊन अहमदशहा अब्दाली आपली सेना घेऊन अटक मार्गे भारतात यायचा आणि लूट करून परत निघून जायचा.


Peshva


त्याचा त्रास जेव्हा वाढला तेव्हा मुघलांनी मराठ्यांकडे मदतीची मागणी केली तेव्हा मराठ्यांमध्ये पेशवेशाही होती आणि तेव्हा अहमदशहा अब्दालीशी सामना करू शकेल अशी पराक्रमी सेना फक्त नानासाहेब पेशव्यांकडे होती नानासाहेब ने आपला अनुभवी सेनापती सख्खा छोटा भाऊ राघोबादादा म्हणजेच रघुनाथराव पेशव्याला मोठी सेना घेऊन उत्तर मोहिमेसाठी पाठवले. रघुनाथरावाने आपल्या घोडदळासह गंगेच्या खोऱ्यात धुमाकूळ घातला होता. त्याने विरोधात असणाऱ्या सर्व राज्यांचा खात्मा करून अहमदशहा अब्दालीने जिंकलेले राज्य मराठा साम्राज्यात सामील केले व पुढे तो पंजाबच्या दिशेने वळू लागला.

अहमदशहा अब्दाली अंतर्गत मोहिमेसाठी अफगाणिस्तानमध्ये परत गेला होता त्याने जाताना आपला मुलगा ताईमुर याला पंजाबची सुभेदारी दिली होती पैशावर मध्ये बसून राज्य कारभार सांभाळणाऱ्या तयमुर शहा वर मुलांचा विशेष राग होता झाली नाही तर कमीत कमी त्याच्या पोराला तरी धडा शिकवला पाहिजे यासाठी त्यांनी मराठ्यांना पंजाब मध्ये उतरविले पंजाब मधील सरदार तसेच मुघल सरदार देखील त्यांच्या बाजूने उभे राहिलेआणि या एकत्र सेनेने 28 एप्रिल 1858 रोजी अब्दालीच्या सेनेचा पराभव करून अटकेचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला हा मराठी इतिहासाचा सर्वोच्च क्षण होता. या विजयामुळे मराठयांचा पराक्रम चारही दिशांना पसरला होता.


इतर माहिती पाहण्यासाठी भाग 2 पहा 👉➡️

Post a Comment

0 Comments