INS khanderi Submarine|भारतीय नौदलात सामील


INS khanderi Submarine|भारतीय नौदलात सामील
               देशातील सर्वोत्तम जहाज निर्माण करणारी कंपनी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड एम डी एल(MDL) द्वारा निर्माण केलेली स्कॉर्पिन या श्रेणीतील दुसरी पाणबुडी खंडेरीला भारतीय नौसेनेत औपचारिकरित्या सामील केले गेले आहे.

               आयएनएस खंदेरीचे नाव हिंदी महासागरातील एका खतरनाक शिकारी माश्यावरून ठेवले असावे. ह्याच नावावर अगोदर एक खंडेरी नावाची पाणबुडी ६ डिसेंबर 1968 रोजी भारतीय नौसेनेत सामील केली गेली होती परंतु वीस वर्षांच्या सेवेनंतर 18 ऑक्टोबर 1989 मध्ये तिला सेवानिवृत्त केले गेले.
               

पुढील आर्टिकल वाचा:-👇

मराठमोळा जनरल....भारताचे नवे लष्करप्रमुखINS Khanderi Submarine

       
                 स्कॉर्पिन श्रेणीतील सहा पाणबुड्या याभारतात तयार करण्यासाठी फ्रान्सच्या नौदल कंपनी डीसीएनएस च्या सोबत करार झाला होता. याश्रेणीतील पहिली पाणबुडी आय एन एस कलवरी होती जिला 14 सप्टेंबर 2017 रोजी भारतीय नौसेनेत औपचारिक रित्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलावतरण केले केले.

                 आयएनएस खंडेरी हि या श्रेणीतील दुसरी पाणबुडी आहे जिला समुद्री परीक्षणासाठी 12 जानेवारी 2017 रोजी जलावतरण केले गेले व दोन वर्षांच्या समुद्री परीक्षणानंतर MDA ने सप्टेंबर 2019 रोजी तिला नौसेनेला सुपुर्द केले. नंतर रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी 28 सप्टेंबर 2019 रोजी तिला  नौसेनेमध्ये कमिशन प्रदान केले. भारतीय
नौदलात कोणत्याही पाणबुडीला सामील करण्यापूर्वी तिचे समुद्री परीक्षण केले जाते मग तिला वापरात आणले जाते.


पुढील आर्टिकल वाचा:-👇


भारतीय नौदलाचे चीफ - admiral Karambir singh


                 स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पाणबुडी आय एन एस करंज जिचा जलावतरण 31 जानेवारी 2018 रोजी केला गेला तिचे समुद्री परीक्षण आता चालू आहे व यानंतर तिला नौसेने कडे सुपुर्द केले जाईल.

                 या श्रेणीतील चौथी पाणबुडी आयएनएस वेला (VELA) जिचा जलावतरण 6 मे 2019 रोजी केला गेला. या पाणबुडीचा देखील समुद्र परीक्षण चालू आहे नंतर तिला नौसेनेत सामील केले जाईल.

                 या श्रेणीतील दोन आणखीण पाणबुड्या म्हणजे वागिर(VAGIR) आणि वागशीर (VAGSHEER) आहेत ज्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या डॉकमध्ये सध्या कार्यरत आहेत. माझगाव डॉक हा देशातील महत्त्वाचा शिप बिल्डर डॉकअसून या शिपबिल्डर्स लिमिटेडला शिप बिल्डर्स टू द नेशन असेसुद्धा म्हटले जाते.

भारताकडे आत्तापर्यंत असणाऱ्या पाणबुड्या :-
 1. INS Shishumar (Attack Submarine)
 2. INS Shankush (Attack Submarine)
 3. INS Shalki (Attack Submarine)
 4. INS Sindhughosh (Attack Submarine)
 5. INS Sindhudhvaj (Attack Submarine)
 6. INS Sindhuraj  (Attack Submarine)
 7. INS Sindhuratna  (Attack Submarine)
 8. INS sindhukesari (Attack Submarine)
 9. INS Sindhukirti (Attack Submarine)
 10. INS Sindhuvijay (Attack Submarine)
 11. INS Sindhurashtra (Attack Submarine)
 12. INS Arighat ( Ballistic Missile Submarine)
 13. INS Karanj (Attack Submarine)
 14. INS Vela (Attack Submarine)
 15. INS Vagir (Attack Submarine)
 16. INS Vagsheer (Attack Submarine)
 17. INS Chakra (Nuclear Power attack Submarine)
 18. INS Arihant (Ballistic Missile Submarine)

नौदलाचे चिन्हं
                             

ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.
ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा व कमेंट करा.
जय हिंद.


Post a Comment

0 Comments