संपादकीय - देशाविषयी आपण जागरूक आहोत का ?

संपादकीय - देशाविषयी आपण जागरूक आहोत का ?
 "देशासाठी 5 मिनिटे वेळ आहे का?"
हा प्रश्न भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांनी देशाबद्दल बोललं आहे.तर हा प्रश्न देशाविषयी चिंता व्यक्त करताना म्हटले आहे.

                   अगदी प्राचीन काळापासून ते इथपर्यंत म्हणजे देशाला स्वातंत्र्य भेटण्यापर्यंत मला तर वाटतं देश ही संकल्पना लोकांना समजलीच नाहीये कारण आपल्या देशात म्हणजे सद्य परिस्थिती जरी पाहिली तरी लोकांना काही देशाच  किंवा भारतीयत्वाचं काहीही पडलेले दिसत नाहीये...कारण देशात पाहिलं की तो अमक्या जातीचा ,तुमक्या मुलुखाचा असे बोलताना सहज दिसतात.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर  यांचे एक सुंदर वाक्य आहे की,

' मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमता ही भारतीय !'

         पण आजचे लोक भारतीय या मुद्द्याकडे किंवा देशाच्या विकासाच्या दृष्टीने किती संवेदनशील आहेत याचा अनुभव पाहण्यासाठी भारताच्या निवडणुका पुरेशा आहेत. याची प्रचिती साध्वी प्रज्ञा, तसेच UP तील काही आमदार, खासदार यांचे वक्तव्य किंवा कारनामे पाहिल्यास पुरेशी ठरते, की एखाद्या ने कितीही मोठा गुन्हा केला, भ्रष्टाचार केला तरी हेच प्रतिनिधी निवडून येतात हे फारच चिंताजनक आहे. मा. रामरहीम बाबा हे नाव ऐकलेच असेल ना  नसेल तर आताच गुगल करा.  आणि पाहा यांच्या भक्तांनी पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला पंजाबमध्ये इंटरनेट सेवा वगैरे बंद करण्यात आली होती. मला तर वाटत असे अंधभक्तांचे प्रमाण आताच्या साक्षर भारतात असणे म्हणजे आश्चर्यकारक आहे. तर आपण देशासाठी काय करतो तर आपल्याला देशाचं नाही पक्षाचं राजकीय इ. पडलेले असते.

           भारताचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे  2 ऑक्टोबर2014 रोजी "स्वच्छ भारतअभियान" राबविण्यात आले. पण लोक अजूनही या गोष्टींना महत्व देत नाहीत. याचे गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे भारत हा समृद्ध आणि विविधतेने नटलेला देश आहे. देश जर स्वच्छ राहिला तर पर्यटन व्यवसाय सुधारलेच तसेच लोकांचं आरोग्य सुधारेल आणि  वायू आणि जल  प्रदुषण देखील कमी होईल.मुंबई चे माजी आयुक्त तिवईकर एकदा बोलले की, जे लोक महानगरपालिकेच्या रोड वरून कुत्रे घेऊन फिरतात, त्यांची कुत्रे त्या रस्त्यावर घाण करतात आणि तेच लोक पुढे रस्ते स्वच्छ नसल्याची तक्रार करतात. जर आपण अमेरिकेत पाहिले तर ज्याचा कुत्रा आहे त्यालाच  रस्त्यावरची कुत्र्याने केलेली घाण साफ करायला लागते नाहीतर तेथील प्रशासन संस्था भलेमोठा दंड ठोठावते. पण भारतात उलट परिस्थिती आहे?                     भारतीयत्व हा मुद्दा पण तेवढाच आहे कारण भारतात आतापर्यंत देशात म्हणजे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत पाहिले तर ते या वंशाचे , ते या जातीचे ,या वर्णाचे अशा मुळे फितुरी होऊन देशावर सतत परकीय आक्रमण होत राहिली आणि अजून सुद्धा पाश्चात्य संस्कृतीचा भारतावर प्रभाव पडत आहे .याचा परिणाम म्हणून देशात बलात्कार अशा घटनेचे प्रमाण वाढत आहे ही चिंतेची बाब आहे आणि महाराष्ट्रात इतर म्हणजे बिहार किंवा उत्तर प्रदेश मधून जे लोक येताहेत त्याकडे देखील तेथील सरकारने अत्यंत गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे. कारण या गोष्टीचा  परिणाम महाराष्ट्रावर होत आहे पण केन्द्र सरकारने यावर लक्ष घालून लवकरात लवकर ज्या त्या राज्यामध्ये औद्योगिक विकास करणे गरजेचे आहे तरच पुरेसा रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारी देखील नष्ट होईल .उर्वरित माहिती दुसऱ्या भागात देण्यात येईल धन्यवाद !  

 तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा .


ही माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल ही आशा बाळगतो.
आणि आवडली तर शेअर करायला विसरू नका.
 GKinformation.info आपले सहर्ष आभारी आहे.


Post a Comment

0 Comments