Manoj Mukund Narvane. मराठमोळा जनरल....भारताचे दुसरे मराठी लष्करप्रमुख

                   नुकतीच बातमी वाचली की, भारताच्या सेनाध्यक्ष पदासाठी दुसऱ्यांदा मराठी माणसाची नियुक्ती खूप भारी वाटलं की, एका मराठी माणसाची 13 लाख सैन्यदल असलेल्या फौजेचे नेतृत्व करणार करणार त्या माणसाचे नाव आहे मुकुंद मनोज नरवणे.


    एकेकाळी हिमालयाच्या धावून गेलेला सह्याद्री पर्वत अशी मराठी परंपरा आहे.....
    मला या काव्यपंक्ती आठवतात.
   काळ्या छातीवरी कोरली 
अभिमानाची लेणी 
पोलादी मनगटे खेळती 
खेळ जीवघेणी 
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, 
निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

             हे गीत शाहीर साबळे यांनी गायले असून कवी राजा यांनी लिहिले आहेत खरंच वाचून देखील अंगावर काटा येतो.हे गीत लहानपणी मराठी शाळेत खूप वेळा ऐकले ही आहे आणि गुणगुणले देखील आहे. खरंच यावरून महाराष्ट्राची शौर्य परंपरा हे गीत दर्शीवते..
            यावरून असे दिसते की, मराठी लोकांनी वेळोवेळी दिल्लीला मदत केली आहे जर आपण स्वातंत्रपूर्व भारतात पाहिलं तर मराठी सत्ता दिल्लीच्या बादशहा ला मदतीसाठी धावून गेलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर, चिंतामणराव देशमुख, यशवंतराव चव्हाण यांनी अनमोल असे देशाला मार्गदर्शन केले आहे..
   भारतीय लष्कराला पहिले मराठी सेनाप्रमुख लाभलेले अरुणकुमार वैद्य सर हे मूळचे अलिबागचे, त्यांनी खलिस्तान वादा विरुद्ध केलेल्या operation मध्ये खूप महत्वाची भूमिका घेतली होती. त्यावेळेस एक स्त्री पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी यांनी ही मोहीम राबवली होती. यामध्ये खलिस्तान वाद्यांनी दोघांची अशी निर्घृणपणे हत्या केली.. खूपच दुःखदायक घटना देशात घडल्या..

             दुसरे मराठमोळे सेनाप्रमुख म्हणून नरवणे सर खूपच eligible , अनुभवी अधिकारी होते कारण प्रदीर्घ 40 वर्षांच्या कालावधीनंतर यांनी सेनाप्रमुख पद भूषवले. त्यांनी अगोदर लष्कराच्या इस्टर्न कमांड चे नेतृत्व केले आहे. इस्टर्न कमांड सुमारे 4000 किमी ची सीमा आहे.. त्यांना सर्जिकल strike इत्यादी खूप अनुभव आहे.. ते 31 डिसेंबर ला पदभार स्वीकारतील

मावळते लष्करप्रमुख :-
             जनरल बिपीन रावत हे CDS होतील अशी शक्यता नाकारता येत नाही..PM मोदी साहेबांनी यावर्षी झालेल्या स्वातंत्र्यदिनी 'Chief of Defence staff' या महत्त्वाच्या पदाची घोषणा केली. कारण हे पद तिन्ही सेनादलाचे समन्वय साधता येईल या अनुषंगाने स्थापन करण्यात येईल.

इतिहासातील दुसरी घटना :-
             भारताच्या तिन्ही सेनादलाचे म्हणजे वायूसेना, भुसेना, व नौसेना या तिन्ही दलाचे प्रमुख 1976 च्या ५६व्या batch चे NDA कॅडेट आहेत. ही लष्करातील दुसरी घटना असून पहिल्यांदा असा प्रसंग 1991-93 च्या दरम्यान घडला होता. चारवेळा दोन सेनादलाचे प्रमुख एकाच batch चे राहिलेले आहेत. विशेष म्हणजे तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांचे पिता वायुदलात अधिकारी म्हणून राहिलेले आहेत.

चिंतेची बाब :-
              मराठी मुलांचे लष्करातील अधिकारी पदावर चे प्रमाण नगण्य आहे. एकेकाळी मराठी साम्राज्य देशातील मोठे साम्राज्य म्हणून ओळखले जायचे.मराठी सरदारांना त्याकाळी जगातील सर्वोत्तम योद्धे म्हणून ओळखले जायचे. परंतु हल्लीच्या काळात मराठी मुलांना विशेषतः याबद्दल महिती नसणे हे खूप दुर्दैवी आहे. आपल्याकडे अशी म्हण आहे की, "शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्मावेत , स्वतःच्या घरात नको" हे दुर्दैव आहे मराठी माणसाचे..


  • इस्टर्न कमांड चे प्रमुख असताना सलामी स्वीकारताना 

सैन्याबद्दल चा नकारार्थी दृष्टिकोन

     नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट वाचण्यात आली, त्यात नरवणे सरांचे जातीचा उल्लेख केला. ही खूपच वाईट गोष्ट आहे. ब्राम्हण संघटनांनी त्यांचे जात इ. बद्दल चा उल्लेख करण्यात आला होता. पण मराठी व्यक्ती जसे लेफ्टनंट जनरल थोरात, माजी सेनाप्रमुख अरुणकुमार वैद्य, एअर मार्शल भोसले सर निवृत्त, लेफ्टनंट जनरल निंभोरकर निवृत्त इ. लोकांनी देशासाठी आपले आयुष्य दिले त्यांच्या कर्तृत्वाकडे न पाहता जात धर्म बघणे यासारखी शोकांतिका दुसरी कुठलीच नाही. महाराष्ट्राने देशाला मराठा व महार रेजिमेंट दिल्यात, विशेष बाब ही आहे की, या भारताच्या रणभूमीवर तसेच शांततेच्या काळात front वर राहिलेल्या आहेत तसेच आघाडीवर लढणाऱ्या रेजिमेंट पैकी या दोन्ही रेजिमेंट आहेत ही विशेष बाब..
राष्ट्रीय रायफल्स

सरकारने लक्ष घालणे जरुरीचे...
              महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे सरकार आहे. सरकारने या गोष्टींवर जातीने लक्ष घालणे जरुरीचे आहे. या स्पर्धा परिक्षांबद्दल सरकारने GR काढावा किंवा सरकारने एखादी योजना राबवून सैन्यदलातील निवृत्त सैनिकांना यासंबंधी नेमावे. हल्ली इंग्रजी शिकण्यासाठी मराठी मुलांना विनामूल्य अशा syllabus /शिक्षणाची सोय करावी.

 INS Khanderi - भारतीय नौदलात सामीलPost a Comment

0 Comments