Forbes India - Mukesh Ambani India's Richest Pearson 'फोर्ब्स' इंडिया च्या यादीत मुकेश अंबानी जगात ९ व्या स्थानी

भारतातील सर्वात श्रीमंत Relianceइंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी(Mukesh Ambani), सलग 12 व्या वर्षासाठी : फोर्ब्स इंडिया (Forbes India)वाणिज्य मासिका फोर्ब्स इंडियाने (Forbes India)2019 च्या वर्षातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी 11 ऑक्टोबर 2019 रोजी जाहीर केली असून मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची एकूण मालमत्ता (51.4 अरब डॉलर्स) आहे त्यामुळे त्यांना पहिल्या जागी स्थान देण्यात आले आहे. सलग 12 वर्षे झाली आहेत जेव्हा मुकेश अंबानी यांना 'फोर्ब्स' (Forbes) देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले गेले आहे. 11 वर्षांपूर्वी 2008 मध्ये जगातील ६वे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे त्यांचे छोटे भाऊ अनिल अंबानी देखील यावर्षी भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत आहेत. गेल्या वर्षी 2018 मध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (Reliance) अनिल अंबानी यांना 68 व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले होते.


मुकेश अंबानींच्या पश्च्यात विप्रोचे अजिम प्रेमजी दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गेल्या बर्‍याच वर्षांपासून होते. परंतु त्यांनी मार्च २०१९ मध्ये त्यांच्या संपत्तीचा सिंहाचा भाग दान केला आणि यावर्षी सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 17 व्या स्थानावर गेले. जर अजीम प्रेमजींनी त्यांच्या संपत्तीचा भाग दान केला नसता तर ते या वर्षीदेखील अव्वल स्थानी असते .त्यामुळे यावर्षी अदानी ग्रुपचे गौतम अदानी दुसर्‍या क्रमांकावर आहेत. (१५. 7 अरब डॉलर्सच्या) मालमत्ता असलेले अदानी 2018 मध्ये 11.9 अरब डॉलर्सच्या संपत्तीसह दहाव्या स्थानी होते.भारतातील श्रीमंत व्यक्ती - Reliance industries चे मालक मुकेश अंबानी  भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या (2019 ) यादीत भारती एअरटेलचे सुनील मित्तल14 व्या स्थानी(७. ६अरब डॉलर ) , डी एल एफचे कुशल पाल सिंह २५ व्या स्थानावर(४.३५ अरब डॉलर ) ,निरमाचे करसन भाई पटेल (३. ९ अरब डॉलर ) ,बायोकॉनच्या किरण मजुमदार शॉ ह्या महिलांमध्ये अव्वल. 54 व्या क्रमांकावर असून यूएसबी इंडियाच्या लीना तिवारी महिलांमध्ये 71 व्या क्रमांकावर आहेत . इन्फोसिसच्या नंदन निलेकणी 78 व्या(१. ८१ अरब डॉलर ) , फ्यूचर ग्रुपचे किशोर बियानी ८० व्या क्रमांकावर(१. ७८ अरब डॉलर ) , पतंजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण (१. ४७ अरब डॉलर ) आणि इंफोसिसचे एस डी शिबुलाल 100 व्या क्रमांकावर (१. ४० अरब डॉलर ) आहेत.
अशा प्रकारे बायोकॉनच्या किरण मजुमदारशॉ ह्या महिलांमध्ये अव्वल 54 व्या क्रमांकावर असून यूएसबी इंडियाच्या लीना तिवारी महिलांमध्ये 71 व्या क्रमांकावर आहेत .
पुढील आर्टिकल वाचा 👇Post a Comment

0 Comments