Ashok Kamte - IPS officer Ashok Kamte Ashok Kamte Solapur

Ashok Kamte - IPS officer Ashok Kamte, Ashok Kamte Solapur

Ashok kamte
                           


वीस वर्षांपूर्वी यूपीएससी परीक्षेच्या वेळी जेव्हा त्यांना प्राधान्यक्रम विचारला होता तेव्हा त्यांनी आयपीएस हा एकमेव पर्याय दिला होता पोलीस दलातील सेवेविषयी त्यांचे असे प्रेम होते.


अशोक कामटे शॉर्टकट, ॲथलेटिक आणि वेटलिफ्टिंग मध्ये सहभागी होत असत आणि शारीरिक कसरतींची व्यायामाची त्यांना इतकी सवय झाली होती की, भारतीय पोलीस सेवेतील शारीरिक दृष्ट्या सर्वोत्तम अधिकाऱ्यांपैकी ते एक होते .  यांच्या पत्नी विनिता ताई असं म्हणतात की घरात पाहुणे जरी आले तरी काहीतरी सबब सांगून ते तासभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ व्यायाम करून घालवायचे. त्यांची उंची पाच फूट 10 इंच च्या जवळपास असली तरी इतरांपेक्षा उंच वाटायचे.


Ashok Kamte Solapur

अशोक कामटें बद्दल असे म्हटले जायचे  की "अशोक कामटे का डंडा और सोलापुर थंडा ".

 त्यांची नुकतीच सोलापूरला जेव्हा नेमणूक झाली होती तेव्हाची एक घटना म्हणजे तिखटाची पुडी , चाकू सुरे  हत्यारे घेतलेल्या पाच हजारांच्या जमावाला त्याला त्यांना तोंड द्यावे लागले. त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त पंधरा शिपाई होते काहीतरी निकराचे पाऊल उचलले नाही तर, जमाव बेछुट होऊन विध्वंस करण्याची भीती होती. त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितली सांगितले की ते स्वतः जमावाचे नेतृत्व करणाऱ्यावर हल्ला करतील.  अशोक कामटेंनी त्या पुढाऱ्याला यांच्या जवळच्या काठीचा तडाका चांगलाच हाणला. त्याबरोबर जमावाची पळापळ सुरू झाली .

IPS Officer Ashok Kamte


कौटुंबिक पार्श्वभूमी:-
त्यांचे घराणे पूर्वीपासूनच लष्करी परंपरा असलेले घराणे होते,घराण्याचा संबंध थेट शिवाजी महाराजांच्या लष्कराशी  येतो. त्यांचे आजोबा नारायणराव ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील पुणे विभागातील जिल्ह्यांवर इन्स्पेक्टर जनरल या पदावर होते. त्यांचे वडील मारोतीराव भारतीय सैन्यात कर्नल या पदावर होते त्यांना कुस्तीची प्रचंड आवड होती.दोन मुले असून त्यांच्या पत्नीचे नाव विनिताताई  आहे.

२६/११ चा हल्ला : -

 मुंबईच्या पूर्व भागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त Ashok Kamte यांना अतिरेक्यांशी कामा आणि अल्ब्लेस हॉस्पिटल बाहेर छत्रपती शिवाजी टर्मिनस समोरच्या अरुंद गल्लीत लढत असताना वीरगती प्राप्त झाली. चार गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या होत्या ,त्यापैकी 2 दोन त्यांच्या आयपीएस चे चिन्ह असलेल्या टोपीत घुसल्या होत्या.

26 हल्ल्याच्या आठवणींचे वर्णन करताना Vishwas Nangare Patil असे म्हणतात ही Ashok Kamte हे नेहमी युद्धाच्या तयारीत असायचे. जेणेकरून जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर त्याचा सामना करता येईल. 26 /11 च्या हल्ल्याच्या वेळी अशोक कामटे एकटेच पोलीस दलातील असे अधिकारी होते की ज्यांच्याकडे AK 47 रायफल होती. 


(अतिरिक्त पोलिस आयुक्त Ashok Kamte यांना मरणोत्तर अशोकचक्र देऊन गौरविण्यात आले.)


GK information कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 

Post a Comment

1 Comments