Andhshraddha | Gavatil Andhashraddha|Andhashradda Nirmoolan

Andhshraddha | Gavatil Andhashraddha|Andhashradda Nirmoolanइतर क्षेत्रात सोडाच परंतु विज्ञानाच्या क्षेत्रात देखील हे झालेले आहे गॅलिलिओने दुर्बीण शोधून काढली .त्याआधारे त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना अशी विनंती केली की त्या दुर्बिणी मधून तुम्ही बघा आतापर्यंत आपल्याला माहित नसलेल्या गुरु या ग्रहाचे आणखी तीन उपग्रह तुम्हाला दिसतील .त्यावेळी विद्यापीठात ॲरिस्टॉटलने सांगितलेल्या ज्ञानाच्या आधारे शिक्षण दिलं जात असे आणि त्याचं म्हणणं हा अंतिम शब्द मानला जात असे .ॲरिस्टॉटलने जे सांगून ठेवलं नाही ते असणे शक्यच नाही ही अशी त्याच्या शिष्यांची श्रद्धा होती, कारण ऍरिस्टॉटल हा प्रकांड पुरुष होता.

त्याचं वर्णन असं केलं जात असे की "He is a master of all who knows".

अरिस्टोटल वरील श्रद्धेमुळे दुर्बिणीतून बघण्यास गॅलिलिओच्या सहकार्यांनी त्याला नकार दिला. ते त्याला म्हणाले, की तुला दिसणारे गुरुचे तीन उपग्रह हे उपग्रह नाहीतच ते तुझ्या दुर्बिणीच्या काचेवरील तीन डाग आहेत. मग गॅलिलिओ म्हणाला मग काच पुसून घेऊ या त्यावर ते म्हणाले की, ती काच पुसून घेतली तरी जर तुला हे उपग्रह दिसत असतील ,तर तुझ्या डोळ्यांमध्ये काही बिघाड झाला आहे .गॅलिलिओ म्हणाला मग तुम्ही तुमचे डोळे लावून बघा ते म्हणाले ,आम्हाला आमचे डोळे लावण्याची गरज वाटत नाही. आमची आमच्या ज्ञानावर आणि गुरूच्या शब्दावर पक्की श्रद्धा आहे. शेवटी या सहकाऱ्यांनी दुर्बिणीतून बघितले नाही.


Gavatil Andhashraddha - लिंबू मिरची


  आपल्याला माहित आहे की इस्लाम मध्ये विवाह करार असतो हिंदुंच्या मध्ये विवाह संस्कार असतो. परंतु विवाह हा काही असो ज्या वेळेला विवाहित घटस्फोट घेतो किंवा पत्नीला नवरा टाकून देतो त्यावेळेला पतीने पत्नीला पोटगी द्यावी अशी तरतूद या देशाच्या घटनेत केली आहे . परंतु मुस्लीम मुल्ला-मौलवी म्हणाले हिंदुंच्या मध्ये लग्न हा संस्कार आहे जन्मोजन्मी साथ जन्मी कसा का असेना दारू पिऊन लाता का घालेना हाच नवरा पाहिजे असं त्यांना वाटतं परंतु तू आमच्या मुस्लिम समाजात लग्न हा करार आहे घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये असतो तसा. दोन्ही बाजूंनी करार संपवण्याची मुभा असते आमच्या धर्माचे स्वरूप आणि आणि त्यानुसार आमच्यातील विवाह स्वरूप हे असं असल्यामुळे आम्ही आमच्या पत्नीला पोटगी देणे लागत नाही खरंतर हा चुकीचा नियम आहे परंतु मुस्लिम मुल्ला-मौलवी त्यांच्या या  निर्णयाला बळी पडले राजीव गांधी यांनी कायदा बदलला आणि मुस्लिम स्त्रीला असलेला पोटगीचा अधिकार काढून घेतला.

  तिसरे उदाहरण आपण हिंदू समाजाचा घेऊ आपल्याला माहीतच आहे की साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातील प्रबोधनाचं एक मोठं व्यासपीठ मानलं जातं कोल्हापूरला दोन वर्षांपूर्वी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शेगावच्या गजानन महाराजांच्या फोटो  समोर दीप प्रज्वलित करून केले. शेगावच्या गजानन महाराजांनी अनेक चमत्कार केले असं वर्णन केलं जातं.Andhshraddha | Gavatil Andhashraddha :-अंधश्रद्धेचा दुसरा प्रकार असतो तो  अमानुष अंधश्रद्धांचा. ज्या अंधश्रद्धा अमानुष असतात त्या अस्तित्वात असतात परंतु त्यांच्याबद्दल समाजा समाजामध्ये  संताप आणि चीड असते. आपल्याला देवदासीच्या पद्धत याबद्दल माहिती आहे. देवदासी च्या प्रथम मध्ये डोक्यात आलेली केसाची जट किंवा आई-वडिलांनी केलेला देवाचा नवस यासाठी मुलीचं लग्न देवाशी अथवा देवीशी लावल जात. यामुळे काय होतं देवाशी लग्न ही कल्पना अनैसर्गिक असल्यामुळे प्रत्यक्षात ती मुलगी मुंबईच्या वेश्या बाजारात विकली जाते किंवा गावच्या सगळ्यांचं धन बनते तिच्या सुखी संसाराच्या स्वप्नांची राग रांगोळी होते त्या गोष्टी आजही चालू आहेत परंतु याबद्दल जनमानसामध्ये संताप चळवळीमुळे जागृत झाला आहे याच प्रकारच्या आणखी काही अंधश्रद्धा म्हणजे अघोरी अंधश्रद्धा काही ठिकाणी नवस फेडण्यासाठी अघोरी पद्धतींचा वापर केला जातो काही जण स्वतःच्या कपाळावर ब्लेडनं चिरा मारून घेतात तर काहीजण पळत येऊन देवळाच्या दगडी भिंतीवर आपलं डोकं आपटून देतात कुठल्याच धर्मानं संतांनी देवाने अशा स्वरूपाची उपासना सांगितलेली नाही हा अघोरी प्रकार धर्म चरणाचा भाग नाही.Andhshraddha - 

मांजर आडवी जाणे
Andhshraddha भाग 2         नमस्कार मित्रांनो..
                        तुम्ही श्रद्धा अंधश्रद्धा या शीर्षकात वाचलेच असेल पण तुम्हाला या सदरात ग्रामीण भागातील अंधश्रद्धा आणि त्यातल्या त्यात अंगात येणे या प्रकाराबद्दल बोलणार आहोत..

मी स्त्रियांबद्दलच्या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत. ग्रामीण भागातील स्रियानवर अंधश्रद्धा पगडा असतोच. पण अंगात येणे हा एक मानसिक रोग आहे याचे ज्ञान ग्रामीण भागातील लोकांना नाही. तर स्त्रियांनाच असले रोग उदभवतात कारण स्त्रिया ह्या बहुतेक गरीब मनाच्या असतात तसेच बहुतांश परिस्थिती गरिबीची असते त्यामुळे अधिक विचाराने त्यांना हा रोग उदभवतो असेच वाटते.
 अंगात येणे ह्या रोगाचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात.
१. सौम्य झटका किंवा तीव्र झटका
२.पारंपरिक वर्तन
३. भ्रमिष्टापणा
४.हिस्टोरीया


अधिक माहितीसाठी पुढील आर्टिकल वाचा 👇


 भूत : सत्य की असत्य वैज्ञानिक दृष्टिकोन


    

Andhshraddha Nirmoolan:-

      अंगात येणे हा एक सौम्य प्रकारचा मानसिक आधार आहे. त्याला "न्यूरोसिस” म्हणतात. अंगात येण्याचे दोन प्रकार पडतात त्यात ढोंगीपणा आणि दुसरा म्हणजे मानसिक आजार. ढोंगीपणा मध्ये मुख्य उद्देश पैसे कमावणे तसेच देवाच्या नावावर कोंबडी मागणे इ. प्रकार घडतात आणि दुसरा म्हणजे मानसिक आजार यामुळे स्त्री आपले मनावरील ताबा किंवा नियंत्रण सोडते.

      अंगात येणे याबाबत समाजात धार्मिक भावभावना, परंपरा दिसतात. मात्र, अंगात येणे ही मनाची विशिष्ट अवस्था असते. हा एक आजार असल्याचे सिद्ध झाले आहे. अशिक्षित, कौटुंबिक समस्या असलेल्या किंवा समाजात न मिसळणाऱ्या एकलकोंड्या व्यक्तींमध्ये अंगात येण्याचे प्रमाण अधिक जाणवते. स्वतःकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांची बुद्धी हे कृत्य करायला भाग पाडते. हा आजार पझेशन सिंड्रोम प्रकारात मोडतो. पझेशन सिंड्रोम म्हणजे मनाचे खेळ. यात अशिक्षित मनुष्याच्या मनात मानसिक भावनेशी संबंध असलेले खेळ अधिक रंगतात. पझेशन सिंड्रोममध्ये गुरफटलेल्या व्यक्ती त्यांच्या मनातील खळबळ कोणाकडे व्यक्त करू शकत नाहीत. कोंडमारा सहन करण्याची त्यांची इच्छा संपल्यावर त्यांच्या अबोध मनाची अवस्था या क्रियेचा (अंगात येणे) शस्त्र म्हणून वापर करते.
       अंधश्रद्धेला बळी पडू नका विज्ञानावर विश्वास ठेवा.
ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा.

Post a Comment

0 Comments