Veer wajekar - Tukaram Hari wajekar Uran che raje
Veer wajekar - Tukaram Hari wajekar  Uran che raje information

उरणचे राजे वीर वाजेकर


    नावात काय आहे असे उगीचंच म्हटले जाते ही उक्ती 'उरणचे राजे वीर वाजेकरांबद्दल सार्थ ठरते'.संसाराची जबाबदारी अर्धवट शिक्षण, संसाराची जबाबदारी तरीही लहानपणापासून देशसेवेची निष्ठा अखंडपणे पेटत ठेवली. देशसेवेचा नंदादीप अखंडपणे तेवत ठेवला. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे Tukaram Hari wajekar.वीर वाजेकरांचा जन्म Raigad जिल्ह्यातील Uran या तालुक्यात जसखार या गावी अत्यंत गरीब कुटूंबात झाला.ते आगरी समाजाचे प्रमुख पुढारी होते.

Veer wajekar - Tukaram Hari wajekar
           
        वीर वाजेकरांचे माध्यमिक शिक्षण ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत चालू होते. परंतु ख्रिस्ती लोक त्यांच्या धर्माचे तत्व तेथील विद्यार्थ्यांवर लादत होते. या कारणामुळे त्यांनी तेथील शाळा सोडून Uran एन.आय. हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला. ते लहानपणपासून प्रखर देशभक्त होते. याचा पुरावा याच  कॉलेज मध्य्ये आला.
त्यांनी देशभर चालू असलेले 'वंदे मातरम' साप्ताहिक आपल्या मित्रांच्या मदतीने चालू ठेवले. अशाप्रकारे त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. प्रसंगी त्यांनी समाजकार्यशी एकरूप झाले तेव्हा त्यांनी आपला औषधाचा कारखाना विकला.       

        स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी आगरी लोकांसाठी 'उरण पेठा आगरी संघटना' Uran येथे स्थापन केली. तसेच आगरी लोकांनी व वाजेकरांनी त्यांच्या हक्कासाठी Uran पेठा आगरी मिठागरे कामगार संघटनेची 20 नोव्हेंबर रोजी स्थापना केली.आगरी लोकांवर सतत जुलूम,अन्याय,अत्याचार तसेच प्रसंगी फुकट सुद्धा काम करावे लागे. ते मिठागरात काम करायचे तेव्हा त्यांना फुकट सुद्धा काम करावे लागे. ते मिठागरात काम करायचे तेव्हा त्यांना त्याचा 2पैसे मोबदला मिळत असे. परत संघर्ष करुन 3 पैसे इतका केला.

        वाजेकरांनी महालण विभागासाठी ‘महालण सभा' ही संघटना स्थापन केली. या संघटनेकरवी त्यांनी आगरी लोकातील आपआपसातील संघर्ष टाळून त्यांना एकत्रित येण्याचे आव्हान केले . या संघटनेद्वारे ते समाजातील लोकांची लग्न लावून देत . त्यासाठी नवरा मुलाला व कुटुंबियांना प्रत्येकी रु .५० जमा करावे लागे .त्यांनी आगरी समाजासाठी १९६५ च्या काळात आगरी संमेलन ठाणे जिल्ह्यात आयोजित केले होते . या संमेलनाचे अध्यक्ष मुख्यमंत्री बी . जी . खेर हे होते. आगरी समाजाबरोबर त्यांना इतर समाजाबद्दल, धर्माबद्दल आपुलकी होती . 

       महात्मा गांधींनी देशभरात असहकार चळवळ चालू केली . त्यांनी त्यावेळी घरादाराचा विचार न करता स्वातंत्र्यपूर्व काळात मिठाचा सत्याग्रह गुजरातमध्ये दांडी या ठिकाणी केला. याच धर्तीवर वाजेकरशेठनी महालण विभागात केला. या कारणास्तव त्यांना अटकदेखील करण्यात आले. त्यांनी मुंबईतील राहत्या ठिकाणी व आपल्या परीने इंग्रजांविरुद्ध अटळ संघर्ष केला. त्यामुळे त्यांना इंग्रज पोलीसठाण्यामध्ये नेऊन दम भरण्यात आला . त्यांना अटक करण्याची धमकीदेखील देण्यात आली व त्यांना मुंबई सोडून जाण्यास सांगितले. परंतु इच्छा नसताना पत्नी कमलाबाई हिच्या आग्रहापोटी त्यांनी मुंबई सोडून स्थलांतर केले. पण Uran to mumbai हे अंतर समुद्रामार्गे एक तासाचे अशा प्रकारे त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले.
     

       वीर वाजेकरांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार या संघटनेच्या धर्तीवर Uran येथे प्रतिसरकारची स्थापना केली. परंतु यामुळे अटक करण्यात आली. अटक झाली तेव्हा त्यांना म्हणजेच इंग्रजांची गाडी अडवायला अख्या रायगड जिल्ह्यातील हजारो लोकांचा जमाव जमला होता. परंतु इंग्रज अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांना तेथून नेण्यात यशस्वी झाले व त्यांना येरवडा तुरुंगात डांबण्यात आले. वाजेकरांची ओळख खूप होती . महाराष्ट्राच्या संयुक्तीकरणाच्या चळवळीत त्यांचाही सहभाग होता . सुधीर फडके यांच्या बरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस प्रोत्साहन व भाग देखील घेतला होता . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे अनेक मित्र हुतात्मे झाले . यामुळे त्यांची ओळख यशवंतराव चव्हाण , वसंतदादा नाईक , शंकरराव चव्हाण , शरद पवार इ . दिग्गज मंडळींबरोबर झाली . ते जेव्हा त्यांना भेटायला जात तेव्हा त्यांना ते आदराने या ‘ उरणचे राजे ' अशी हाक मारत . त्यांना बोकडविरा येथे बहजन लोकांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून शाळेची स्थापना केली . परंतु काही कारणास्तव ही शाळा फुडे या ठिकाणी हलविण्यात आली व कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेने त्यांच्याच संस्थेचे विद्यालय माध्यमिक शिक्षणासाठी चालू करण्यात आले . या माध्यमिक शिक्षणासाठीच्या शाळेचे नाव ‘Mahalan' असे ठेवण्यात आले . त्यांची मान्यता त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या ओळखीद्वारे आणण्यात आली. त्या विद्यालयाला त्यांच्या गौरवासाठी वीर वाजेकरांचेच नाव देण्यात आले. पुढे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून १९८९ साली फुडे येथे महालण विभागाकरिता कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे महाविद्यालय Veer Wajekar College सुरू झाले


       वीर वाजेकर महात्मा गांधींचे अनुयायी असल्याने ते काँग्रेस या पक्षामध्ये कार्यरत होते. परंतु म .गांधी, लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर हा पक्ष आपल्या तत्त्वापासून अलिप्त राहिला . म्हणून शेतकरी, कामगार ,कष्टकरी लोकांसाठी त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला . त्यांनी शे . का . प .मध्ये राहून कामगार ,कष्टक-यांची चळवळ चालू ठेवली . अशाप्रकारे वीर वाजेकरांनी महात्मा गांधींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकर व म. फुलेंचा वैचारिक वारसा चालू ठेवत अखंडपणे समाजाच्या आर्थिक व राजकीय विकासासाठी आपल्या कार्याबद्दलची एकनिष्ठता अखंडपणे चालू ठेवली. त्यांच्या जनतेमधील प्रतिमेमुळेच ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.

       ‘सिंह तो सिंहच! ' त्यांनी बंदीच्या शृंखला तोडून अखंडपणे समाजकार्य करत मिठागार चळवळ , असहकार चळवळ , आगरी समाजाचे संघटन याद्वारे आपले समाजप्रबोधन चालूच ठेवले. ते नेहमी म्हणत ‘ सर्वांना समान हक्क , रोजगार मिळाला पाहिजे. खेडी जर स्वयंपूर्ण बनवायची असतील त्याला औद्योगिकरणाची पूरक जोड दिली पाहिजे. 'अशा या धगधगत्या अग्नीला व सिंहाला कोटी कोटी प्रणाम !

Post a Comment

4 Comments