भूत : सत्य की असत्य वैज्ञानिक दृष्टिकोन

       

 भूत असतात का ? खरंच भूत असतात का? भूत असतात का नाही?
भूत ही संकल्पना प्रामुख्याने खेड्या गावातील एक भीती असते. ती भीती प्रामुख्याने तेथील म्हातारे इ. लोकांनी सांगताना ऐकली असेलच पण भुतं खरोखरच असतात का? तर मला वाटते भुत ही संकल्पना एक थोतांडचं वाटतं कारण जग आता 21 व्या शतकात वाटचाल करत असताना भूत ही संकल्पना अजूनही जनमानसावर प्रभाव आहे. परंतु भूत खरेच असते का!...
         गावाबाहेर किंवा जंगलात जाताना कधी कोणाच्या तोंडून भूत किंवा अनैसर्गिक शक्ती असल्याचा प्रत्यय अनुभवलाच असेल जास्त करून म्हाताऱ्या लोकांनी, पण ही खरोखरच भूत असतात का? की एखाद्या जंगलाच्या ठिकाणी प्रकाश किंवा पाहणे म्हणजे भूत का? मग प्रश्न पडतो भूत जंगलातच असतात का? गावात किंवा शहरात कधी असा उजेड पडतो का? किंवा आग लागते का? तर उत्तर नाहीच असे मला वाटते कारण मग प्रश्न पडतो की जंगलात आग लागते तर मग गावात किंवा शहरात अशा घटना का घडत नाहीत?

      पूर्वीच्या काळी लोक फारशी लोक अशिक्षित तर मग हा नैसर्गिक चमत्कार कसा घडतो याचे मी छानसे वैज्ञानिक स्पष्टीकरण देतो, या गोष्टीचा विज्ञानाशी संबंध येतो तर येतोच कारण अणू, रेणू, संयुगे, ज्वलन विज्ञानाशिवाय कोणती शाखा किंवा विषय यावर नीटसे स्पष्टीकरण देऊ शकते हो का नाही
तर होच पण याचा डायरेक्ट संबंध विज्ञानाची शाखा असलेल्या जैविक रासायनशास्त्राशी संबंध येतो तर पाहू याच....
        जैविक रसायनशास्त्र प्रामुख्याने कार्बन आणि हायड्रोजन च्या अणूंवरती depend आहे. जैविक रसायनशास्त्र च्या इ 10 वीला 2014 च्या syllabus ला ययाचा संदर्भ होताच. तर मग आपण पाहुयात की ही आग कशी लागते आणि ती रात्रीच का लागते?
       जंगल म्हणल्यावर निसर्गाचा एक सुंदर असा भाग जो हिरवळ, पक्ष्यांचे प्राण्यांचे सूंदर आवाज, वाऱ्याची लहर, पाण्याचा झुळझुळ आवाज, मोराचे ओरडणे इ. मग आग कशी लागते. जंगलावर माणसाचा उदरनिर्वाह चालतो जसे की लाकूड पासून मध वगैरे खायच्या वस्तूत.. याबरोबर जंगलात माणूस प्राणी म्हणजे गाय,म्हैस, बैल इ. पाळीव प्राणी आणि कोंबडी,बदक वगैरे मृत्यू पडली तर माणूस जंगलात आणून टाकायचा आणि टाकतोपन, तसेच काही पक्षी प्राणी नैसर्गिकरित्या जंगलात मृत्यू मुखी पडले तर कालांतराने त्यांचे अवशेष विघटन होऊन त्याजागी कार्बन आणि हायड्रोजन चे अणू रेणू तयार होतात आणि त्यांचा संयोग होऊन संयुगे बनतात आणि CH4 हा संयुगे तयार होते मग प्रश्न पडतो आग कशी लागते?..
      जेव्हा CH4 चा ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होते तेव्हा ज्वलन त्याला इंग्लिश मध्ये combustion म्हणतात.तर मग ज्वलन कसे होते पाहुयात... आगीसाठी मुख्यतः आपल्याला इंधन आणि हवा यांची गरज पडते. जेव्हा मिथेन चा ऑक्सिजन सोबत संयोग होतो तर आग तयार होते.. 
अभिक्रिया: 

  याला रेडॉक्स अभिक्रिया असेही म्हणतात.

या अभिक्रिया मध्ये मिथेन आणि ऑक्सिजन चा संयोग होऊन कार्बन dioxide बाहेर पडतो आणि गॅसच्या रुपात पाणी बाहेर पडते.
याप्रकारे आग लागते..
टीप : अधिक माहितीसाठी खालील पानास जरूर भेट द्या.ही माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल ही आशा बाळगतो.
आणि आवडली तर शेअर करायला विसरू नका.
आपले GKinformation.info  सहर्ष आभारी आहे
आणि follow करायला विसरू नका..
धन्यवाद

      
       

Post a Comment

0 Comments